पोस्ट्स

1952 पासून आढावा विधानसभेचा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात, मानेंची एंट्री

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.  जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती कर

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी तर राजारामबापुंचा पराभव

इमेज
स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली 25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेली मुंबई प्रांताची ही दुसरी निवडणूक. प्रांतात 53 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात जतमध्ये विजयसिंह डफळे हे सर्वाधिक 15605 मतांनी तर शिराळा मतदार संघातून यशवंत चंद्रू पाटील हे केवळ 796 एवढ्या कमी मतांनी जिंकले. येथे राजारामबापू पाटील यांचा पराभव झाला. या 1952 च्या पहिल्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांतात लोकशाहीची पाळेमुळे रुजू लागली होती. अनेकांना निवडणुकीविषयी कुतूहल निर्माण होत होते. दुसरी पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी 1957 रोजी घेण्यात आली. यावेळी मुंबई प्रांतातील जागा वाढविण्यात आल्या. पहिल्या निवडणुकीत 268 असणार्‍या जागा एकदम 339 झाल्या. यामध्ये खुल्या वर्गासाठी 266 तर एस. सी. साठी 42 तर अनुसूचित जातीसाठी 31 जागा राखीव ठेवण्यात आल्या. आपल्या भागातील विटा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. या मतदारसंघातून एक राखीव आणि एक खुला असे दोन आमदार निवडून यायचे होते. या निवडणुकीत भगवान नानासाहेब मोरे व म्हडाले पिराजीराव ताव्याप्पा हे दोघे आमदार म्हणून निवडून आले.

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

इमेज
 वसंतदादां,  कळंत्रे आक्का, गुंडू दशरथ पाटील, दत्ताजीराव सूर्यवंशी, एस. डी. पाटील,  सरोजिनी बाबर निवडून आल्या. दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. नव्या युगाची नवी सुरुवात झाली. अजून देशात लोकशाही स्थिरस्थावर झाली नव्हती आणि प्रांत रचनाही झाली नव्हती, परंतु इंग्रजांनी करून ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रांताने भूभाग ओळखला जायचा. मुंबई प्रांतही त्यातीलच एक भाग. या मुंबई प्रांतात सध्याच्या गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र हा भाग असल्याने येथील  अहमदाबाद, बडोदा, सूरत हेही भाग होते. तसेच सध्याच्या कर्नाटकातील चिक्कोडी, रायबाग, गोकाक, बेळगाव, हुक्केरी, तिकोटा, मुद्देबिहाळ, जमखंडी, मुधोळ, बागलकोट, धारवाड, हुबळी, गदग, हावेरी हे भाग मुंबई प्रांतातच होते. 26 मार्च 1952 रोजी मुंबई प्रांतांची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. एकूण 268 जागांसाठी ही निवडणूक झाली, त्यामध्ये 260 खुल्या, तर 8 जागा राखीव होत्या. पहिल्याच निवडणुकीत 50.78 टक्के मतदान झाले. या पहिल्याच निवडणुकीत ऑल इंडिया भारतीय जनसंघ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, एफ.बी.अखिल भारतीय हिंदू महासभा काँग्रेस कृपीकर लोक पार्टी,

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी