MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी तर राजारामबापुंचा पराभव

स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती.



दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली

25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेली मुंबई प्रांताची ही दुसरी निवडणूक. प्रांतात 53 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात जतमध्ये विजयसिंह डफळे हे सर्वाधिक 15605 मतांनी तर शिराळा मतदार संघातून यशवंत चंद्रू पाटील हे केवळ 796 एवढ्या कमी मतांनी जिंकले. येथे राजारामबापू पाटील यांचा पराभव झाला. या 1952 च्या पहिल्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांतात लोकशाहीची पाळेमुळे रुजू लागली होती. अनेकांना निवडणुकीविषयी कुतूहल निर्माण होत होते. दुसरी पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी 1957 रोजी घेण्यात आली. यावेळी मुंबई प्रांतातील जागा वाढविण्यात आल्या. पहिल्या निवडणुकीत 268 असणार्‍या जागा एकदम 339 झाल्या. यामध्ये खुल्या वर्गासाठी 266 तर एस. सी. साठी 42 तर अनुसूचित जातीसाठी 31 जागा राखीव ठेवण्यात आल्या.

आपल्या भागातील विटा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. या मतदारसंघातून एक राखीव आणि एक खुला असे दोन आमदार निवडून यायचे होते. या निवडणुकीत भगवान नानासाहेब मोरे व म्हडाले पिराजीराव ताव्याप्पा हे दोघे आमदार म्हणून निवडून आले. सांगलीमधून वसंतदादा पाटील यांनी दुसर्‍यांदा बाजी मारली. जतमधून पुन्हा एकदा विजयसिंहराव रामराव डफळे आले. त्यांनी शिवराम सखाराम कोलप यांचा 10261 मतांनी पराभव केला.

 मिरजेतून गुंड दशरथ पाटील तर तासगावमधून जी. डी. लाड हे विजयी झाले. पहिल्या निवडणुकीत लाइ पराभूत झाले होते. वाळव्यातून नागनाथअण्णा नायकवडी आमदार म्हणून निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. शिराळ्यातून यशवंत चंदू पाटील यांनी विजय मिळविला. सांगलीमधून वसंतदादा पाटील यांनी माधव हरी गोडबोले यांचा 14266 मतांनी पराभव केला. जतमध्ये विजयसिंहराव रामराव डफळे यानी श्रीमती कळंत्रे आक्का यांचा 15605 मतांनी पराभव केला. पहिल्या निवडणुकीत कळंत्रे आक्का मिरजेमधून निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्या जतमधून उभ्या होत्या. कवठेमहांकाळ 

मतदार संघ रद्द झाल्याने तेथील विद्यमान आमदार जी. डी. पाटील यांना मिरज मतदार संघातून उभे करण्यात पूर्व तासगाव आणि पश्चिम तासगाव मिळून एकच मतदार संघ करण्यात आला. येथून गतवेळचे पराभूत उमेदवार क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी विद्यमान 

दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांचा 5404 मतांनी पराभव केला. विट्यातून दोन जागा निवडून द्यायचे होते. एक राखीव आणि एक खुला त्यामध्ये भगवान नानासाहेब मोरे व म्हडाले पिराजीराव ताय्याप्पा हे दोघे आमदार म्हणून निवडून आले.

पहिल्या निवडणुकीतील इस्लामपूर मतदार संघ हे नाव बदलून वाळवा मतदार संघ झाला. येथून गतवेळचे पराभूत उमेदवार क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी विद्यमान आमदार एस. डी. पाटील यांचा 9623 मतांनी पराभव केला.

स्वातंत्र्यसैनिकांचा विजय

1952 च्या पहिल्या निवडणुकीत सांगलीतून स्वातंत्र्यैनिक वसंतदादा पाटील यांच्याशिवाय दुसर्‍या कोणालाही विजय मिळविता आला नव्हता. सांगलीतून अण्णा बाबुराव देवर्षी मिरजेतून घोडिराम माळी, तासगावमधून जी. डी. लाड आणि इस्लामपूरमधून नागनाथअण्णा नायकवडी यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु 1957 च्या या दुसर्‍या निवडणुकीत नागनाथअण्णा नायकवडी आणि जी. डी. बापू लाड या स्वातंत्र्यसैनिकांनी विजयश्री खेचून आणली,

वाळवा शिराळा असे नामकरण असणारा मतदार संघ या निवडणुकीत केवळ शिराळा मतदार संघ असे ओळखला जावू लागला. येवून यशंवतराव चंदू पाटील यांनी राजारामबापू पाटील यांचा केवळ 796 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत आठपैकी सांगली आणि मिरजेतून वसंतदादा पाटील आणि गुंड दशरथ पाटील हे दोघेचे निवडून आले. विजयसिंह डफळे सरकार हे जतमधून अपक्ष तर वर्कर्स पार्टीचे नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. लाड, भगवान नानासाहेब मोरे आणि यशवंत चंदू पाटील हे निवडून आले. विट्यातून म्हडाले पिराजीराव ताय्याप्मा हे ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षातर्फे निवडून आले.

वाळवा तालुक्यातील कासेगावचे राजारामबापू पाटील यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

पहिल्या निवडणुकीत पराभूत झालेले नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. लाड यांनी निवडणुकीतील चुका टाळून दुसर्‍या निवडणुकीत बाजी मारली. काँग्रेसच्या विरोधात पर्यायाने दादांच्या विरोधात त्यांचे राजकारण सुरू होते. वर्कर्स पार्टीच्या तिकीटावर उमे असेलेले हे दोघे पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात होते.या विधानसभेत गुजरात आणि महाराष्ट्रातील आमदारांचा संघर्ष जोरदार उफाळून येत होता. मुंबई आणि बेळगावसह सीमा भागासाठी जोरदार रणकंदण सुरू होते. प्रांतवार रचनेला गती आली होती. राज्यातील मातब्बर मंडळी आपआपली संस्थांने शाबूत ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. बहुतांश भागात स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती.

 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी