पोस्ट्स

सांगली वार्तापत्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ

इमेज
अमृत चौगुले भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे.  उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ

मिरज पॅटर्न सक्रीय

इमेज
 उदय रावळ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आता आपल्या प्रभागातील विकास कामांना गती देत आहेत. गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा समोर ठेवण्यासाठी जनतेसमोर जावं लागणार आहे. त्यामुळे कामे लवकर संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु आत्तापासूनच गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. म्हणजेच मिरज पॅटर्न सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. महापालिका नगरसेवकांची मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे. तसतसे नगरसेवक आता अनेकांच्या चौकटीसमोर उभे दिसत आहे. भाऊ, काका, दादा, साहेब, मावशी, काकू, तात्या असा उपाद्या देवून गोंजरण्याचे नाटक आता सुरू झाले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय नाट्याचा प्रयोग पाहत अनेक  विद्यमान नगरसेवकांनी लॉगींग सुरू केली आहे. मिरज पॅटर्न प्रमाणे दादा, भाऊ, साहेब गट तयार होत आहे. मिरजेत झालेल्या लक्ष्मी मार्केटमधील आयलॅड उद्घाटनावेळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, कॉंग्रेसचे विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्ती राज्य अध्यक्ष समित कदम हे सर्वजण कार्यक्रमानिमित्त

जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा वेट अ‍ॅण्ड वॉच

इमेज
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर,  अनिल कदम  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जुलैमध्ये होणार असली तरी सुनावणी झाली तरी पावसाळ्यात या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबणीवर पडत आहेत. यापूर्वी आरक्षण पडलेले आरक्षण बदलणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या कारणांमुळे दिवाळीचा फराळ खाऊनच उमेदवार राजकीय आखाड्यात उतरतील, असे चित्र दिसत आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या असून, त्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. एप्रिल महिन्यात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. निवडणूक घेण्याबाबत यावेळी तरी नक्कीच काहीतरी निर्णय येईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड

नायकवडींनी रेटून लावला महापौर कार्यालयात अजितदादांचा फोटो

महापौरांकडून स्टंटबाजीचा आरोप: फोटो उतरवला जनप्रवास,  प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो महापौर कार्यालयात लावण्यावरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक, नगरसेवक अतहर नायकवडी यांच्यात शाब्दिक वाद झाला. महापौरांना भेट दिलेला अजित पवारांचा फोटो महापौरांनी कार्यालयात न लावल्याने स्वत: नायकवडी यांनी रेटून कार्यालयात फोटो लावला. यामुळे संतप्त महापौरांनी नायकवडी यांना स्टंटबाजी करू नका, असे सुनावले. तर क्षणातच उपमुख्यमंत्री पवार यांचा फोटो महापौर कार्यालयातून उतरवला.  राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीसहून अधिक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. नऊ मंत्रीपदे देखील दादा गटाला मिळाली आहेत. त्यामुळे राज्यात सध्या शरद पवार विरूध्द अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे पडसाद आता सांगली महापालिकेत उमटू लागले आहेत. मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर महापौैर दिग्विजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची

अन्यथा सुतगिरणीबाबत वेगळा विचार करावा लागेल : तानाजी पाटीलांचा इशारा

इमेज
tqnajipatilyanchaeashara    तालुक्यात सहकार संस्था टिकवणे काळाची गरज  जनप्रवास प्रतिनिधी, आटपाडी  तालुक्यातील कारखाना सुरू करण शेतकरी आणि कामगाराच्या हिताच्या आहे मात्र विरोधकाकडून तक्रारी करून विघ्न आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही बँकेकडून आणलेला कारखाना त्यांनी अजूनही सहकारी तत्त्वावर चालवावा मात्र घाणेरडे उद्योग बंद करावेत अन्यथा खाजगी केलेली सूतगिरण पुन्हा बँकेच्या ताब्यात  घेण्यासह कारखान्यातील उद्योग उघड्यावर आणण्याची वेळ आमच्यावर आणून देऊ नका, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील विरोधकांना दिला आहे.अजून वेळ गेली नसून सहकार पध्दतीने चालवणार असेल तर या मोठ्या मनाने देऊ ठाकू.          माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने बँकेकडून 'लिव इन लायसन' मधून पाच वर्षे चालवण्यासाठी करारावर ताब्यात घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.जिल्हा बँकेच्या ताब्यातून माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने चालविण्यासाठी करारावर घेतला आहे. यावेळी पाटील म्हणाले,  बंद असलेला साखर कारखाना, पाच वर्षे जिल्हा बँकेत असतानाही कारखाना पुन्हा सुरू करण्यात तात्कालीन सत्ताधार्‍यांना

तासगाव नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीची भिस्त रोहितदादांवर...

इमेज
 विनायक कदम, जनप्रवास तासगाव नगरपालिकेत चमत्कार घडवून सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी चालविली आहे. पक्षात अनेक इच्छुकांची देखील भाऊगर्दी झाली आहे. मात्र पालिकेत सत्तेत येण्याच्या आशेवर असलेल्या नेत्यांची राष्ट्रवादीची सगळी भिस्त युवा नेते रोहित पाटील यांच्यावरच आहे. सत्तेत येण्याआधी भाजप नेत्यांसोबत साटेलोटेच्या चर्चा थांबवत कार्यकर्त्यांना तयार करावे लागेल.  सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकत लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याचे चित्र होते. शहरातील प्रस्थापित म्हणून असलेल्या कारभार्‍यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारून रिंगणातून पळ काढला. मात्र नवख्या उमेदवारांसह कसेबसे लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र त्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला. पाच वर्षापूर्वी पराभूत मानसिकतेने निवडणूक लढवली गेली होती. मात्र, स्वर्गीय आर.आर.पाटील यांची पुण्याई मतदानातून दिसून आली. राष्ट्रवादीची व्होट बँक भक्कम असल्याचे स्पष्ट होऊन देखील गेल्या पाच वर्षात शहरात ठो

जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई

इमेज
 जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई महाविकास आघाडी मजबुतीची मदार : जिल्हा परिषद, पंचायत समितीची ‘लिटमस टेस्ट’  अमृत चौगुले, जनप्रवास राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकीकडे नव्याने बांधणीचे शिवधनुष्य पेलताना जयंत पाटील यांना जिल्ह्यात मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्याची जणू आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लिटमस टेस्टच ठरणार आहे. आतापर्यंत करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांना टप्प्यात येण्यापूर्वीच घरच्या मैदानात आऊट करण्याची फिल्डिंग लागणार हे उघड आहे. त्यामुळे आता राज्यापेक्षाही जिल्ह्यात राष्ट्रवादीला फुटीपासून रोखण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना एकसंध ठेवण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सन 1999 मध्ये काँग्रेस फुटीनंतर जिल्ह्यात काँग्रेसला तुल्यबळ राष्ट्रवादी बळकट होती व आजही आहे. अर्थात स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या पश्चात काँग्रेसची धुरा स्व.पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, स्व.मदनभाऊ पाटील यांनी सांभाळली होती, तर राष्ट्रवादीची जयंत पाटील, स्व.आर. आर.पाटील यांनी सांभाळली हो

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे बिगुल वाजणार?

इमेज
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आदेश, इच्छुकांची उत्सुकता वाढली  सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहांची दीड वर्षापूर्वी संपली असल्याने निवडणुकीबाबत उत्सुकता असताना राज्य निवडणूक विभागाने मतदार याद्या अद्यावत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. यापूर्वी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले तरी जिल्हा निवडणूक विभागही निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे. त्यामुळे लवकरच मिनी मंत्रालयाचा बिगुल वाजणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 60 मतदारसंघ होते. पुर्नरचनेनुसार आठ मतदारसंघ वाढले आहेत. त्यामुळे जुन्या गटनिहाय की नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांची मतदार यादी अद्ययावत करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिष

युवा नेते आमदारकीच्या प्रतिक्षेत...

इमेज
 राजकीय बातम्या, विशेष लेख, जाहिरातीसाठी तसेच  सोशल मिडीयावरील प्रमोशनसाठी त्वरित संपर्क साधा.    9850652056, 8275592062 जनप्रवास 2 जुलै 2023 दिनेशकुमार ऐतवडे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लागण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. लोकसभेला संजयकाका आणि विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. पण जिल्ह्यातील युवा नेते इच्छुक आहेत ते विधानसभेला. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघ आहेत. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, सुरेश खाडे, विक्रम सावंत, विश्वजित कदम, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर यांची उमेदवारी निश्चित असल्यासारखी आहे. तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील राष्ट्रवादीकडून उतरण्याची तयारी करत आहेत. पण चिंता लागून राहिली आहे, ती युवा नेत्यांमधून. गेल्या पाच  दहा वर्षापासून अनेक आंदोलने, विकासकामे, जनसंपर्काच्या माध्यमातून युवा नेते आमदारकीची तयारी करीत आहेत. परंतु सर्वच पक्षात युवा नेत्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. उमेदवारी नाही मिळाली तर मात्र बंडखोरी करण्याची तयारीही ठेवावी लागणार आहे. सांगली विधानसभा मतदार संघ भाजपकडे आहे. येथे पुढील आमदार मीच असणार असे सु

सांगलीकरामुळे प्रदेशाध्यक्षपदाची वाढली उंची

इमेज
  जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे सांगलीकरामुळे प्रदेशाध्यक्षपदाची वाढली उंची सांगली :  मला आता पक्षाची जबाबदारी द्या, बघा पक्ष कसा पळवितो, असे विधान नुकतेच राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत केले आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती प्रदेशाध्यक्षपदाची. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असल्याने सांगली आणि राज्यात जयंत पाटील यांच्या समर्थकांनी जयंत पाटील यांनी पक्षवाढीसाठी काय काय केले आहे, आणि राज्यात पक्ष किती विस्तारला आहे, याच्या माहितीची रकानेच्या रकाने सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.    सांगलीकरांना प्रदेशाध्यक्ष पद हे काय नवीन नाही. आजपयंर्ंत जिल्ह्यातील वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रा. शरद पाटील आणि जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. या सर्वांनीच प्रदेशाध्यक्ष पदाला तर न्याय दिलाच शिवाय या नेत्यांमुळे प्रदेशाध्यक्ष पदाची उंचीही वाढली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 1952 च्या निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय झालेल्या वसंतदादा पाटील यांना 1966 मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी