पोस्ट्स

सांगली क्राईम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

गाडी आडवी मारल्याच्या रागातून समडोळी फाट्यावर तरुणास बेदम मारहाण :

इमेज
 गाडी आडवी मारल्याच्या रागातून समडोळी फाट्यावर तरुणास बेदम मारहाण :  अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल. सांगली : लक्ष्मी फाटा ते कवठेपेरानकडे जाणार्‍या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या तरुणास अडवून गाडी आडवी का मारली या रागातून चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटनाही शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समडोळी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी जखमी मोहसीन गुफुर मोमीन (वय 37 रा. भादोले ता. हातकणंगले) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी मोहसीन मोमीन हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले गावामध्ये राहतात. सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात ते ब्रदर म्हणून काम करतात. शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री काम आटोपून मोमीन हे गावी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान कडे जाणार्‍या मार्गावरून जात असताना समडोळी फाट्याजवळ अज्ञात चौघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी मोमीन यांची दुचाकी अडवून तू आमच्या

माळवाडीत व्याजावरील पैशांचा दंड देण्यासाठी पती-पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण

इमेज
  सांगली : व्याजाने घेतलेले पैसे मुद्दल आणि व्याजासहित परत करून देखील व्याजावरील दंड दिला नाही म्हणून तरुणाच्या घरात घुसून तिघांनी पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.   व्याजावरील पैशांचा दंड देण्यासाठी पती-पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण :  माळवाडीतील घटना : महिला सावकारासह तिघांवर गुन्हा दाखल.   सदरची घटना हि रविवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी दहा आणि सोमवार दि. 22 जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास माळवाडी येथे घडली. या प्रकरणी जखमी प्रकाश राजाराम मळवडे (वय 26 रा. माळवाडी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सावकार महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. छाया दानेकरी, प्रशांत दानेकरी आणि अभिजित दानेकरी (सर्व रा. माळवाडी ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी प्रकाश मळवडे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील माळवाडी मधील जैन बस्ती जवळ राहतात. प्रकाश मळवडे यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरची मुद्द्द्ल आणि व्याज प्रकाश मळवडे य

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

इमेज
 कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू :  जमिनीचा वाद ; पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणानंतर माजी सरपंचांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय 58, आपटे मळा, मेन रोड कसबेडिग्रज) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संशयित सुनिल चव्हाण, संजय चव्हाण, विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश सायमोते याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमिन संशयित संजय चव्हाण हे करत होते. एक वर्षापूर्वीच शुभम यानी सदरची 27 गुंठे जमिन विक्री करणार असल्याबद्दल मृत सायमोते यांना सांगितले होते. सायमोते यांनी संशयित संज

सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले

इमेज
  : ८५ हजारांचे दागिने केले लंपास.  सांगली : शहरातील गणेशनगर येथे असणारे सराफी दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. दुकानात ठेवलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ८५ हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. सदर चोरीची घटना हि बुधवार दि. २० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमर पांडुरंग शिंदे (वय ३६ रा. त्रिमूर्ती चौक, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. \   सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले  याबाबत अधिक माहिती अशी कि, अमर शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह त्रिमूर्ती चौक परिसरात राहतात. त्यांचे गणेशनगर मधील स्विमिंग टॅंकच्या पाठीमागे सराफी दुकान आहे. मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी शिंदे हे नेहमी प्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या लोखंडी शटरच्या कुलुपाच्या पट्ट्या कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील काउंटर मध्ये ठेवलेले चांदीचे आणि ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच

सांगलीतून दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

इमेज
: दोन लाखाच्या सहा दुचाकी हस्तगत : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.  गेल्या सहा महिन्यात शहरासह जिल्ह्यातून सहाशेहून अधिक दुचाकी चोरीला गेल्याचे वृत्त दैनिक जनप्रवासने प्रकाशित करताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील विश्रामबागसह अन्य ठिकाणाहून लंपास केलेल्या दुचाकींची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुलाजवळ मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. संतोष मारुती हाके (वय १९, रा. बागेवाडी, ता. जत, जि. सांगली ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजारच्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरट्यास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गस्त वाढविली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी विनायक सुतार यांना चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यासाठी चोरटा तानंग फाट्यानजीक असणाऱ्या पुल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने

सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त.

इमेज
 सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त.  सांगली : आरग येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून चोरीतील सोन्याची चेन, अंगठीसह १ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शहरातील चिन्मय पार्क जवळ सदरची कारवाई केली. आबूतालिफ मुसा इराणी (वय २८ रा. किर्लोस्करवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.   याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरज तालुक्यातील आरग येथे राहणारे अण्णासो गायकवाड हे दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर चालत निघाले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगून गायकवाड यांना लुटले होते. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना माहिती मि

विश्रामबाग मध्ये भरदिवसा चेन स्नॅचिंग :

 महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे दागिने हिसडा मारून केले लंपास.   सांगली : विश्रामबाग परिसरातील पार्श्वनाथ कॉलनी मध्ये भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदर चेन स्नॅचिंगची घटना हि आज मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संजीवनी दिलीप हुक्कीरे (वय ५३ रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी कि, संजीवनी हुक्कीरे या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील धामणी रोडवरील पार्श्वनाथ कॉलनी मध्ये राहतात. आज मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी त्या कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. घरासमोर त्यांची गाडी लावत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले. हुक्कीरे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले असता त्यांनी संजीवनी हुक्कीरे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसडा मारून पलायन केले. संजीवनी हुक्कीरे यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत

कुख्यात गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून

इमेज
अनैतिक संबंधातून संपवले : कोयत्याने डोक्यात तब्बल २४ वार ; संशयित स्वतः पोलिसांत हजर.    सांगली जनप्रवास : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन उर्फ कमलाकर पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) याचा आज पहाटे कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याने आपल्याच घरात सच्या टारझनवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सच्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खून करणारा संशयित गणेश मोरे हा रक्ताने माखलेला कोयता घेवून स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंडाच्या खुनामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रांची मोठी गर्दी होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका ख

बेडग सरपंच उमेश पाटील व उपसरपंच मल्हारी नागरगोजे यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

जनप्रवास प्रतिनिधी मिरज मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  स्वागत कमान पाडल्याच्या आरोपाखाली बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश शंकर पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द अखेर मिरज ग्रामीण पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार महादेव कांबळे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.   सरपंच, उपसरपंचावरील या कारवाईनंतर बेडग गांव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तर स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट दिली. स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या दोघांना केली अटक

 २० हजारांचा मुद्देमाल केला जप्त.  जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : शहरात गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या शिराळा तालुक्यातील दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सादर लक्ष्मण जावळे (वय २५) आणि अमन महम्मद शेख (वय २३ दोघे रा. मांगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.  सांगली शहरातील आझाद चौक येथे काही दिवसांपूर्वी एका गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली कि, दोन संशयित व्यक्ती या ट्रक अड्डा येथे फिरत आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना जेरबंद केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी आझाद चौक येथील एका कारची काच फोडून त्यातील रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. यावेळी दोघांकडून चोरीतील रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमा

माजी सहायक आयुक्तांच्या मुलासह दोघांना अटक :

 बोगस बांधकाम परवाना प्रकरण ; पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचाही समावेश. जनप्रवास । प्रतिनिधी महापालिकेचा बोगस बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी माजी सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांचा मुलगा राहूल उर्फ सोमनाथ रमेश वाघमारे (वय ३०, रा. नेमिनाथनगर, विश्रामबाग) आणि  नगररचना विभागातील कंत्राटी कर्मचारी महादेव नारायण पाटील (वय ३५ रा. कापूसखेड, ता. वाळवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील पवनकुमार बापू झेंडे आणि संतोष संजय झेंडे या दोघांचा मोकळा प्लॉट आहे. या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी त्यांनी बांधकाम परवाना घेण्यासाठी एजंट राहूल वाघमारे यांच्याकडे कागदपत्रे दिली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसात महापालिकेचा बांधकाम परवाना देण्यात आला. या परवान्याबाबतची माहिती झेंडे यांच्या शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी झेंडे यांना बांधकाम परवाना कसा मिळाला याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी हा परवाना बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे रितसर तक्रार करण्यात आली. त्यावेळी महापालिकेच्या पथकाने त्याठिकाणी जावू

गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणावर छापा टाकून कारवाई

  ४ किलो गांजासह १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.  जनप्रवास । प्रतिनिधी  शहरातील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील काळ्या वाटेकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून विक्रीसाठी गांजा घेऊन निघालेल्या तरुणावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या तरुणांकडून ४ किलो ४ ग्रॅम वजनाचा गांजा एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई हि शुक्रवार दि. २१ जुलै रोजी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. नहीम मेहबूब कागजी (वय २५ रा. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शुक्रवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, संशयित कागजी हा दुचाकीवरून आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे गांजा विक्री करण्यासाठी थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकला असता संशयित कागजी हा मोटारसायकल (क्र. एमएच सीव्ही ६००८) वर संशयितरित्या थांबलेला दिसला. यावेळी त्याला सापळा रचून जेरबंद करत त्याची

उमदी पोलिसांनी गांजा तस्करीचा केला पर्दाफाश

इमेज
 ९८ किलो गांजासह १३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त : तिघांना केली अटक, दोघेजण पसार.  जनप्रवास । प्रतिनिधी उमदी : आध्र प्रदेश मधून उमदी मध्ये विक्रीसाठी आलेल्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश उमदी पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला. पोलिसांनी ९७ किलो ८५५ ग्रॅम वजनाचा वाळलेला गांजा आणि कार असा एकूण १३ लाख ६८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या इफतेखारूल हुसेन उर्फ अरबाज बाबासाहेब शेख (वय ३६ रा. कुपवाड), प्रतीक हरिदास कांबळे (वय २८ रा. नागराळे, ता. पलूस) आणि मोहसीन मेहबूब कागजी (वय २८ रा. १०० फुटी रोड, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश भाई (रा. राजमंद्री, आंध्र प्रदेश) आणि पिंटू माळी (रा. सांगली) हे दोघे पसार झाले आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी कि, उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना माहिती मिळाली कि, उमदीतील अमोघसिद्ध मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक जुनी स्विफ्ट गाडी (क्र. एमएच १३ एझेड १३७९) हि थांबली असून सदरच्या गाडीतून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे संदीप शिंदे यांनी पथकासह त्

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी