पोस्ट्स

लोकसभा वार्तापत्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल, शाहू महाराज

इमेज
 महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल, शाहू महाराज  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही, असे नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ती लवकरच येईल, असा निर्वाळा दिला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी असे विधान करत एक प्रकारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आपण उमेदवार असणार, असे स्पष्ट केले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा झाला. तेव्हा त्यांनी सर्वप्रथम श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबतची चर्चा केली होती. तथापि, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शाहू महाराज हे निवडणुकीबाबत चर्चेत आहेत. हे मला प्रथमच कळत आहे, असे सांगितले. पण याचवेळी त्यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील तर आम्हाला आनंदच होईल, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते. त्यानंतर गेले दोन दिवस कोल्हापुरात शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू होती. याबाबत आज श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधून कोल्हाप

RAJU SHETTI : भाजप नेत्यांबरोबर अद्याप चर्चाच नाही : शेट्टी

इमेज
भाजप नेत्यांबरोबर अद्याप चर्चाच नाही : शेट्टी  जनप्रवास । जयसिंगपूर मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, प्रत्यक्ष माझ्याबरोबर कुणी अशी चर्चा केलेली नाही, महाविकास आघाडीकडूनही जागा वाटप झाल्याच्या चर्चा होतात, यामध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी  यांनी दिली आहे. कितीही मोठी ऑफर दिली तरीही हुरळून जाणार नाही, आपण फक्त शेतकरी चळवळीसाठी काम करणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.  मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे कृत्य लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राजू शेट्टींसोबत संपर्क साधला जात असून त्यांना महायुतीत सहभागी होण्याची विनंती केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, या बातम्या पेरल्या जात आहेत.  अप्रत्यक्षपणे येऊन काही लोक दिल्लीला भेटण्याचा आग्रह करतात. आमचा यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. महाविकास आघाडीकडून काही ठिकाणी जागा सुटल्याच्या चर्चा होतात. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे,  आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठीच काम करणार. आघाडीतून मत मागाय

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची.  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार हाळवणकर आणि राहूल आवाडे हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राजवर्धन निंबाळकर यांची निवड लोकसभा मतदार संघावर जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजप काढून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. ही दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. आता येथे भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपची बरीच दमछाक होणार हे नक्की हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली य

राजू शेट्टी, धैर्यशिल माने अ‍ॅक्शन मोडवर

इमेज
जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. अगदी अनपेक्षितपणे काँग्रेसचे एकहाती सत्ता मिळविली. आता वेध लागले आहेत ते 2024 च्या लोकसभेचे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात हॉट सिट म्हणून ओळखल्या जाणार्‍या हातकणंगले मतदार संघातही वातावरण तयार होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि विद्यमान खासदार धैर्यशिल माने सध्या अ‍ॅक्शन मोडवर आहेत. कोल्हापूर  आणि सांगली जिल्ह्यातील गावनगाव पिंजून काढण्यास दोघांनीही सुरूवात केली आहे.  हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा पूर्वीचा इचलकरंजी मतदार संघ. या मतदार संघावर बाळासाहेब माने यांची निर्विवाद सत्ता होती. मतदार संघ पुनर्रचनेत हा मतदार संघ हातकणंगले मतदार संघ म्हणून ओळखला जावू लागला. या मतदार संघाला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि वाळवा हे दोन विधानसभा मतदार संघ जोडले गेल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकारण निदान लोकसभेपुरतेतर एकमेकावर अवलंबून राहू लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची वर्दळ शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघात वाढू लागली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. राष्ट्रवादीने तत्कालि

..नवीन लोकसभा, तर महाराष्ट्रातून 82 खासदार होतील

इमेज
 नवीन संसदेचे रविवारी उद्घाटन झाले. यापूर्वी जुन्या लोकसभेत खासदारांना बसण्यासाठी जागेची मर्यादा होती. यामुळे लोकसंख्येनुसार नवीन सीमांकन झाले नव्हते. आता नवीन इमारतीत जास्त जागा करण्यात आल्या आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याचे म्हटले आहे.  यामुळे पुन्हा नव्याने सीमांकनाची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन  सीमांकनाबाबत उल्लेख केला. यापूर्वी 1976 सीमांकन झाले होते. त्यानुसार लोकसभेच्या 543 जागा आहे. आता 2026 मध्ये सीमांकन होण्याची शक्यता आहे. काय होणार बदल गेल्या 52 वर्षांपासून लोकसंख्येच्या आधारे सीमांकन झालेले नाही. सध्याच्या लोकसभेच्या 543 जागा 1971 च्या जनगणनेच्या आधारावर आहे. 1971 च्या जनगणनेला आधार मानून शेवटचे परिसीमन 1976 मध्ये केले गेले. त्यावेळी देशाची लोकसंख्या 54 कोटी होती. त्यानंतर देशात शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. 2021 ची जनगणना अजून व्हायची आहे. परंतु आत

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी