पोस्ट्स

जयंत पाटील लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

इमेज
जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या  महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र!  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सूरू झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय महाविकास आघाडीचे वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक बदनाम करण्याच षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.  अशोक चव्हाण यांच्यानंतर जयंत पाटलांच्या चर्चा  जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एक बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. नुकतंच काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्ताधारी पक्षात गेल्याने जयंत पाटील यांच्या पदरात काय पडणार इथपर्यंत चर्चा रंगू लागल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी

इस्लामपूर येथे निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमचक्री

इमेज
    इस्लामपूर येथील पंचायत समितीसमोर निषेध मोर्चातील तिरडीवरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पोलिसांच्यामधील धुमश्चक्री.    इस्लामपूर  येथे भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमचक्री  इस्लामपूर (ता.वाळवा) येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पोलिसां मध्ये पक्षपाती निवडणूक आयोग व भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी तिरडी हिसकावून घेण्याचा,तर कार्यकर्त्यांनी उरली-सुरली तिरडी पेठ-सांगली रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी युवक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षपाती निवडणूक आयोग व भाजपा सरकारच्या निषेधाच्या, तसेच राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.       निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेत खा.शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आय

तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय

इमेज
 तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय - जयंत पाटील यांचा आरोप सोलापूर : महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या अडचणीत आणले तरी भविष्यात हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी दौरा करून टेंभुर्णी (ता. माढा ) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कणाहीन निवडणूक आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्वादी काँग्रेस पक्ष आहे. देशातील विविध

शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,

इमेज
 शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,  अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी; जयंत पाटलांचा युक्तिवाद मुंबई : शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (यांनी सांगितलं. तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केली असंही उत्तर त्यांनी दिलं. राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यावेळी अजित पवार गटाच्या वतीने जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली.  त्या आधीच्या यिु्क्तवादात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.  वकिलांचे प्रश्न आणि जयंत पाटलाचं उत्तर पुराव्याच

jayant patil : कर्नाटकात बजरंग बलीचा आणि आता देशात रामाचा आधार

इमेज
   jayant patil : कर्नाटकात बजरंग बलीचा आणि आता देशात रामाचा आधार जयंत पाटलांचा पीएम मोदींना टोला निपाणी : महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सीमाभागातील निपाणीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला.  यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की, काळ बदलला आहे, देशातील परिस्थिती वेगळी आहे. कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला होता. आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे. महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.   ते पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसला होता तोच उत्साह दिसत आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत उत्तम पाटील हे आगामी निवडणुकीत आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.  मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळा

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल. सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात, मानेंची एंट्री

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.  जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती कर

जयंत पाटील राष्ट्रवादी वर्धापनदिन

 

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी