SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणानंतर माजी सरपंचांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय 58, आपटे मळा, मेन रोड कसबेडिग्रज) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संशयित सुनिल चव्हाण, संजय चव्हाण, विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश सायमोते याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमिन संशयित संजय चव्हाण हे करत होते. एक वर्षापूर्वीच शुभम यानी सदरची 27 गुंठे जमिन विक्री करणार असल्याबद्दल मृत सायमोते यांना सांगितले होते. सायमोते यांनी संशयित संजयला तो कसत असलेली जमिन विकत घेण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगितले होते. त्यानंतर सायमोते यांनी वकीलामार्फत जमिन कसणार्या संजयला व त्याच्या भावांना जमिन खरेदी करणार असून हरकत असल्यास सांगण्याबाबत नोटीस पाठवली. नोटीसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी खरेदीपत्र करून सायमोते यांनी जमिन खरेदी केली. त्यानंतर तलाठी कार्यालयात हरकत घेतली होती.
दरम्यान, या प्रकारानंतर सायमोते हे आज सकाळी साडेनऊ वाजता बसस्थानक चौकात सुपर टेलर दुकानात कपडे घेण्यासाठी गेले तेव्हा संशयित पाचजण तेथे आले. त्यांनी सायमोते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. काहीजणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सायमोते यांचा मुलगा अविनाश तेथे आला.
वडिलांना सोडवताना त्यालाही धक्काबुक्की केली. हा वाद सुरु असताना सायमोते हे खाली कोसळून बेशुद्ध पडले. तेव्हा मुलगा अविनाश यांच्यासह नातेवाईकांनी दुचाकीवरून गावात खासगी दवाखान्यात नेले. त्यांनी सांगलीत नेण्यास सांगितले. सांगलीत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. सिव्हीलमध्ये नेल्यानंतर ते मृत झाल्याचे सांगितले.
उत्तरीय तपासणीत सायमोते यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान अविनाश सायमोते याने दिलेल्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालानुसार संशयित संजय चव्हाणसह पाचजणांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा