पोस्ट्स

kolhapur लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका

इमेज
 हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका इचलकरंजी : खासदारांनी आत्तापर्यंत काय केले? भाजपच्या लोकांशी बोलताना लोक त्यांना बदला असे म्हणतात, अशी टीका भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली. या टिकेला पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये उत्तर देऊ, अशी भूमिका खासदार माने यांनी बुधवारी व्यक्त केली. शिरदवाड (ता. शिरोळ) येथे विकास कामांच्या उद्घघाटन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. यावेळी आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इकडे भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत आवाडे यांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना चिमटा काढला. लोक म्हणतात; आम्ही नाही देशात तिसर्‍यांदा मोदी हेच पंतप्रधान होणार. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. परंतु इथे खासदार कोण आहेत. त्यांनी या भागाचा आतापर्यंत काय दिले याचे उत्तरे लोक मागत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काहीतरी निर्णय घेतील. आम्ही काही कोणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्

कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय - सतेज पाटील

इमेज
कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय - सतेज पाटील संभाजीराजे यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांसाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांची महाविकास आघाडीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच त्यांची आणि श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेऊन याबाबत निर्णय होईल, असे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्याने महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी गोंधळ आहे का या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत अजून महायुतीने पत्ते खोलले नाहीत. कोणते पक्ष किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट नाही. किमान महाविकास आघाडीच्या बैठका तरी झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी 10 तारखेचा मुहूर्त ठरला आहे. जागा वाटप झाल्यानंतरच दिशा स्पष्ट होणार यामुळे महाविकास आघाडीत काही अडचण असणार नाही. कोल्हाप

अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी

इमेज
 अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए. वाय. पाटलांची हकालपट्टी   हसन मुश्रीफांशी पंगा भोवला बिद्री साखर कारखान्यामध्ये हसन मुश्रीफांविरोधात घेतलेला पंगा ए. वाय. पाटील यांना भोवला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती.    कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वैर पत्करून थेट शिंदे गटाशी जवळीक साधलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिद्री साखर कारखान्यामध्ये हसन मुश्रीफांविरोधात घेतलेला पंगा ए. वाय. पाटील यांना भोवला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती.  ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर यांना पराभवाचा धक्का नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झाली होती. तथापि, बिद्रीच

खासदार धैर्यशील माने म्हणतात, सतेज पाटलांची कोल्हापुरात कळ काढून चालत नाही!

इमेज
 खासदार धैर्यशील माने म्हणतात, सतेज पाटलांची कोल्हापुरात कळ काढून चालत नाही!  ऐन निवडणुकीच्या तोंडावर धास्ती की सावध पवित्रा? कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांचे भरभरून कौतुक केल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. निमशिरगावमधील कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी पी. बी. पाटील विकास सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी धैर्यशील माने यांनी केलेल्या वक्तव्यांची चांगली चर्चा रंगली. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धसका की सावध पवित्रा याची सुद्धा चर्चा रंगली आहे. हातकणंगले मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून माने यांच्यावरून नाराजीचा सूर आहे.  शरद पवार म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे 84 वर्षाचा तरुण  धैर्यशील माने यांनी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. शरद पवार म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे 84 वर्षाचा तरुण अशी स्तुतीस

kolhapur loksabha: ज्यानं हरवलं त्याचाच प्रचार करण्याची वेळ!

इमेज
 ज्यानं हरवलं त्याचाच प्रचार करण्याची वेळ!  कोल्हापूर लोकसभेला मंडलिक महाडिकांचा राजकीय ’योगायोग’! कोल्हापूर लोकसत्ता : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून रविवारी राज्यभर मेळावे घेण्यात आले. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग सुद्धा फुंकण्यात आले. महायुतीचा कोल्हापूरमध्ये सुद्धा मेळावा पार पडला. यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबिटकर सोडून सर्वच महायुतीच्या नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. कोल्हापुरातील दोन्ही जागा शिंदे गटाला  या मेळाव्यामध्ये बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभेसह हातकणंगले लोकसभेची जागा शिंदे गटाला सोडण्यात येईल, याबाबत निर्णय झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हापुरातील दोन जागा शिंदे गटाला मिळणार यावर जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपने कोल्हापूर लोकसभेसाठी चांगलीच चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता ही जागा आपण शिंदे गटासाठी राहणार की ऐनवेळी यामध्ये का

कुंजीवनमध्ये बालकांवर मौजीबंधन संस्कार

इमेज
उदगाव कुंजवन येथे महोत्सवात मौजीबंधन संस्कार करताना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज समोर उपस्थित बालके   उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवन महोत्सवात दोनशेहून अधिक बालकांवर मौजीबंधन संस्कार करण्यात आले. आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज यांनी मुलांवर स्वतः संस्कार करत त्यांना व्रत व उपदेश दिला. यावेळी यागमंडल विधान, गुरूकृपा व्रतसंस्कार महोत्सव हजारो भक्तांच्या व मुनीश्रींच्या ससंघाच्या उपस्थितीत संपन्न झाला.   गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात आले.  सकाळी जाप्य, अभिषेक, शांतीधारा, नित्य पूजा याचबरोबर सौभाग्यवती महिला व कुमारिका यांच्याद्वारे गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात आले. ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते झाले. मौजीबंधन संस्कार विधी मुख्य सभा मंडपात अंतर्मना आचार्य श्रींच्या सानिध्यात व मंत्रोच्चाराने झाला. यावेळी जैन धर्माच्या परंपरेनुसार जीवनाची वाटचाल कशी करावी. कोण कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, व्यसनापासून दूर राहावे, शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ आहार, आई-वडिलांची सेवा, समाजाप्रति असलेली जाणीव असा धर्मोपदेश आचार्य श्री यांनी उपस्थित बालकांना

सांगलीत अक्षता कलशाचे पूजन; शहरातून शोभायात्रा

इमेज
जनप्रवास ।  सांगली:  अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या जानेवारीत होणार्‍या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रविवारी सांगलीत मंगल अक्षता कलशाचे पूजन करून रथातून शोभा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सजवलेल्या रथात मंगल कलश ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहर राममय झाले होते. कोटणीस महाराज, केळकर महाराज, गोडसे महाराज आदींसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हेही आवर्जुन वाचा ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न... (loksabha ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी? (sangli )काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप जोमात   अयोध्येतील श्री राम मंदिराचे दि. 22 जानेवारीला होणार आहे.  त्या सोहळ्यानिमित्त देशभरात मंगल अक्षता कलश यात्रा काढण्यात येत आहे. रविवारी सांगलीत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मारुती चौकात मुख्य कलशासह 21 कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या रथात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेसमोर मंगल अक्षता कलश ठेवण्यात आला. यात्रेत मोठ्या संख्येने राम भक्त भगव्या टोप्या घालून करून तर महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.  मार्गावर लक्षवेधक रांगोळ्या  मारुती चौकातून बालाजी चौक तेथ

संन्मती सागर महाराज यांच्या प्रेरणेने कुंजवांचे नंदनवन झाले:

इमेज
जयसिंगपूर    तपस्वी सम्राट आचार्य श्री संन्मती सागर महाराज यांच्या प्रेरणेने कुंजवनचे नंदनवन झाले आहे. या त्यांच्या समाधीस्थळी सम्मेद शिखरजीमधून उदगाव कुंजवनला आपण विहार करण्यास हीच गुरुभक्तीच कारणीभूत आहे. आचार्य प्रसन्नसागर महाराज यांनी आपल्या प्रवचनात बोलताना सांगितले. उदगाव (ता. शिरोळ) येथे कुंजवन येथे सुरू असलेल्या आनंद महोत्सवात तपस्वी सम्राट आचार्य श्री संन्मती सागर महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. महाराज पुढे म्हणाले, तपस्वी सम्राट संन्मती सागर महाराज यांची तपश्चर्या व साधना खूप महान होती.  या महान तपश्चर्या असणाऱ्या गुरुवर्यांच्या तेजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्तगण येत होते. सकाळी कुंजवन येथून गावातील प्रमुख मार्गावरून तपस्वी सम्राटांच्या प्रतिमेची बँड व ढोल पथक, हत्ती घोडे आणि महिलांनी डोक्यावर कलश घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या पद्मप्रभू या विशालकाय मूर्तीच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.  दुपारी गुरुमंदिरात नूतन सुवर्ण लेपन केलेल्या मूर्तीवर व चरण पादूकावर हळद, चंदन, दुध, दही, उसा

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची.  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार हाळवणकर आणि राहूल आवाडे हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राजवर्धन निंबाळकर यांची निवड लोकसभा मतदार संघावर जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजप काढून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. ही दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. आता येथे भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपची बरीच दमछाक होणार हे नक्की हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली य

माझ्यावर कधी पेपर फाडण्याची, काच फोडण्याची, फोन बंद करण्याची वेळ आली नाही,

इमेज
जनप्रवास,  कोल्हापूर मी आयुष्यात कधी अपरिपक्वपणा केलेला नाही. कधीही विचलित झालेलो नाही. त्यामुळे माझ्यावर कधी पेपर फाडण्याची, काच फोडण्याची, फोन बंद करण्याची  वेळ आली नाही, अशा शब्दांत कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांनी केलेल्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिले.  ते म्हणाले, मी कुणाच्या पालापाचोळ्यावर पाय दिला नाही, माझी सहीसलामत सुटका होत गेली, सगळ्यांनी मला आशीर्वाद दिल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांचे प्रथमच आज (शुक्रवार) कोल्हापुरात आगमन झाले. मुश्रीफ यांनी पवार एके पवार म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार एकच असल्याची प्रतिक्रिया दिली.  आमची पालखी शरद पवारांकडेच जाणार आहे. आपण अजितदादांना साथ देऊया, जनतेचा मी आभारी आहे, जिल्ह्यामध्ये  राष्ट्रवादी भक्कम करुया, मी कोल्हापूरचा पालकमंत्री झालेलो नाही, पण जिल्ह्याचे पालकत्व पार पाडेन, असा विश्वास देतो, असेही ते म्हणाले.  कोल्हापूर ते कागल देवदर्शन आणि जंगी स्वागतानंतर मुश्रीफ यांचा कागलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात मनोगत

मुश्रीफ मंत्री होताच समरजित घाटगें नाराज

इमेज
 सासूसाठी वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली, अशी स्थिती कोल्हापूर जिल्ह्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. रविवारी मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच राजे भूमिगत झाले होते. नेहमीच संपर्कात असणारे रविवार दुपारपासून त्यांचा कोणताच संपर्क होत नव्हता. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. फडणवीस यांनी समरजित यांना विधानसभेची तयारी सुरुच ठेवण्याचा शब्द झाली आहे. उभय नेत्यांमध्ये मंत्रालयात चर्चा झाली. त्यामुळे समरजित घाटगे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या उलटसूलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान राजेंच्या नाराजीची चर्चा रंगल्यानंतर त्यांच्याकडे अन्य पक्षांकडूनही चाचपणी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.  देवेंद्र फडणवीस यांनी राजेंना मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असला, तरी तुम्ही त्रास करून घेण्याची गरज ना

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे काय?

इमेज
मुश्रीफांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाचा चेहराच अडचणीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अजित पवारांच्या कळपात उडी घेतली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापना करताना कोल्हापूर जिल्ह्याने शंभर हत्तींचे बळ दिले त्याच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था पाहून अजित पवार चांगलेच संतप्त झाले होते. तेच अजित पवार आज समर्थक आमदारांसह भाजपच्या वळचणीला गेल्याने पक्ष आणखी रसातळाला गेला आहे. कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पाच आमदार आणि दोन खासदार अशी ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीचे आज केवळ दोनच आमदार आहेत, तेसुद्धा आता बाजूला झाल्याने कोल्हापुरातील नेतृत्वहीन झाले आहेत. त्यामुळे कैफियत तरी कोणाकडे मांडायची अशी स्थिती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्येकर्त्यांची आहे. आमदार हसन मुश्रीफांची अजित पवारांवरील निष्ठा कमी अन् ईडीने छळल्याचा त्रास त्यांची झोप उडवून देणारा होता. त्यामुळे शरद पवारांची सावली सोडून ते अजित पवरांच्या कळपात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, ज्यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आहे, ते ए. वा

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी