पोस्ट्स

भाजप आणि शिवसेने लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली?

इमेज
आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली?  सदाभाऊ खोतांचा भाजपला संतप्त सवाल सांगली: आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुका जवळ आल्यावरच भाजपला मित्रपक्षांची आठवण होते असं म्हणत माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. घटक पक्षाला सन्मान द्या, मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.  सांगलीतील महायुतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची खदखद बाहेर आली. ते म्हणाले की, सगळ्यांना खर्‍या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि सेना हे मोठे पक्ष आहेत. छोटे घटक बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे. असे करू नका, आम्हालाही सन्मान द्या.  सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही, तो सन्मान द्या.  घटक पक्ष आला की हसू नका. मुंगी

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची.  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार हाळवणकर आणि राहूल आवाडे हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राजवर्धन निंबाळकर यांची निवड लोकसभा मतदार संघावर जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजप काढून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. ही दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. आता येथे भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपची बरीच दमछाक होणार हे नक्की हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली य

सांगलीत भाजप सुसाट, काँग्रेसमध्ये मतभिन्नता

इमेज
आ. सुधीर गाडगीळ यांची विकास कामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल  अनिल कदम जनप्रवास  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप सुसाट असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभिन्नता असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी सांगली शहरासह ग्रामीण भागात कामांचा सपाटा लावला आहे. रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सांगली-पेठ रस्ता, कवलापूर विमानतळाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. जनसंपर्काच्या माध्यमातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे गाडगीळ विधानसभेतील मार्ग सुकर असल्याचे चित्र दिसून येते. भाजपचे सांगली मतदारसंघातील आमदार गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे आठ वर्षापुर्वी कुणालाही वाटले नव्हते. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ

इमेज
अमृत चौगुले भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे.  उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निशिकांत पाटील

इमेज
शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग, प्रदेशाध्यक्षांकडून निवडी जाहीर  जनप्रवास  सांगली   मागील चार महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी अखेर पार पडल्या. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची तर शहर जिल्हाध्यक्षपदी कुपवाडचे नगरसवेक प्रकाश ढंग यांची निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडी जाहीर केल्या.  भाजप जिल्ह्यात भाकरी फिरवणार असून संघटनात्मक बदल करणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवड होणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले होते. मात्र निवडींबाबत एकमत होत नसल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अखेर बुधवारी त्याला मुर्हूत मिळाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्षाच्या ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदावर नवीन निवडी जाहीर केल्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निशिकांतदादा पाटील यांच्यासह संग्रामसिंह देशमुख यांचे नाव चर्चेत होते. पाटील यांची अपेक्षेप्रमाणे

नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिक अडचण

इमेज
राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार असून त्याची किंमत महाविकास आघाडीसह सत्ताधारी भाजपलाही मोजावी लागणार आहे.  राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार असून त्याची किंमत महाविकास आघाडीसह सत्ताधारी भाजपलाही मोजावी लागणार आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांना मंत्रीपदाची आशा होती. परंतु, बदलत्या समीकरणात ती आशा धुळीस मिळण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार अजित पवारांसोबत राहण्याची शक्यता असल्याने त्या जागांवर तयारी करणार्‍या भाजपमधील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाईल. तशीच स्थिती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा प्रभाव बाजार समित्यांच्या निवडणुकीत अधोरेखीत झाला होता. नाशिक आणि दिंडोरी हे लोकसभेचे दोन मतदारसंघ मजबूत करण्याच्या प्रयत्नात भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीच्या फुटीर गटाला अधिक वाटा द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे विविध पातळीवर परिणाम होणार आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मंत्रीपदा

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी