पोस्ट्स

राष्ट्रवादी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,

इमेज
 किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,  शरद पवार गटाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 24 फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे. कार्यक्रमाचा खास टिझर प्रदर्शित शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावर या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलीय. या कार्यक्रमाचे एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय. शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आलीय. या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवं नाव!

इमेज
  शरद पवार गटाचं नाव ठरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवं नाव! नवी दिल्ली: पवार गटाला ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला  केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव देण्यात आलं. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला  काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिलं आहे.  शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी हे नाव,आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळे या नावाचा पर्याय

शरद पवारांना सर्वोच्च धक्का

इमेज
 राष्ट्रवादी अन् घड्याळ अजितदादांचेच निवडणूक आयोगाचा निकाल : शरद पवारांना सर्वोच्च धक्का मुंबई : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे.  राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे.  जो पक्ष उभारला आता तोच पक्ष हातून गेला  मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित

अजितदादांकडून आर आर आबा गटाचा सत्कार स्वीकारण्यास नकार

इमेज
 माझी काय राखली म्हणत अजितदादांकडून आर आर आबा गटाचा सत्कार स्वीकारण्यास नकार सांगली : यायला लागतयं असा आग्रह आर आर आबांच्या कार्यकर्त्यांनी धरताच उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्याच्या महत्वाच्या निर्णयात सक्रिय मदत केली. तरीही तुम्ही माझी काय राखली? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावमध्ये आर आर आबा गटाच्या कार्यकर्त्यांचा आदर सत्कार स्वीकारण्यास आणि आबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला. सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगली जिल्ह्याचा धावता दौरा केला.  विटा येथे स्व.आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट देउन सांगलीला परतत असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. अगदी तासगावच्या वेशीवर खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनीही स्वागत केले.यानंतर तासगाव बाजार समितीजवळ आल्यानंतर पवार यांची मोटार आरआर आबा पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, अमोल शिंदे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांची मोटार अडवून आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करा आणि आमचा सत्कार स्वीकारा असा आग्रह करीत होते.यावेळी मी आताच सांत्वन भेट केली असल्या

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल. सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

सदाशिवराव पाटील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी डिजीटल बॅनरद्वारे व्यक्त केल्या भावना

इमेज
  "आता वेळ निर्णयाची"  भूमिकेकडे लागल्या नजरा प्रताप मेटकरी : जनप्रवास विटा         राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि ॲड. सदाशिवराव पाटील यांचे छायाचित्र असलेल्या डिजीटल बॅनरवर "आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशा शब्दांत भावना व्यक्त करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या लक्षवेधी बॅनरमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.        सध्या राज्याच्या राजकारणामध्ये  धक्कादायक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा कार

शालीनीताई पाटील यांचे शरद पवार यांच्याबद्दल मत

 

नायकवडींनी रेटून लावला महापौर कार्यालयात अजितदादांचा फोटो

महापौरांकडून स्टंटबाजीचा आरोप: फोटो उतरवला जनप्रवास,  प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो महापौर कार्यालयात लावण्यावरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक, नगरसेवक अतहर नायकवडी यांच्यात शाब्दिक वाद झाला. महापौरांना भेट दिलेला अजित पवारांचा फोटो महापौरांनी कार्यालयात न लावल्याने स्वत: नायकवडी यांनी रेटून कार्यालयात फोटो लावला. यामुळे संतप्त महापौरांनी नायकवडी यांना स्टंटबाजी करू नका, असे सुनावले. तर क्षणातच उपमुख्यमंत्री पवार यांचा फोटो महापौर कार्यालयातून उतरवला.  राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीसहून अधिक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. नऊ मंत्रीपदे देखील दादा गटाला मिळाली आहेत. त्यामुळे राज्यात सध्या शरद पवार विरूध्द अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे पडसाद आता सांगली महापालिकेत उमटू लागले आहेत. मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर महापौैर दिग्विजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची

तासगाव नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीची भिस्त रोहितदादांवर...

इमेज
 विनायक कदम, जनप्रवास तासगाव नगरपालिकेत चमत्कार घडवून सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी चालविली आहे. पक्षात अनेक इच्छुकांची देखील भाऊगर्दी झाली आहे. मात्र पालिकेत सत्तेत येण्याच्या आशेवर असलेल्या नेत्यांची राष्ट्रवादीची सगळी भिस्त युवा नेते रोहित पाटील यांच्यावरच आहे. सत्तेत येण्याआधी भाजप नेत्यांसोबत साटेलोटेच्या चर्चा थांबवत कार्यकर्त्यांना तयार करावे लागेल.  सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकत लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याचे चित्र होते. शहरातील प्रस्थापित म्हणून असलेल्या कारभार्‍यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारून रिंगणातून पळ काढला. मात्र नवख्या उमेदवारांसह कसेबसे लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र त्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला. पाच वर्षापूर्वी पराभूत मानसिकतेने निवडणूक लढवली गेली होती. मात्र, स्वर्गीय आर.आर.पाटील यांची पुण्याई मतदानातून दिसून आली. राष्ट्रवादीची व्होट बँक भक्कम असल्याचे स्पष्ट होऊन देखील गेल्या पाच वर्षात शहरात ठो

जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई

इमेज
 जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई महाविकास आघाडी मजबुतीची मदार : जिल्हा परिषद, पंचायत समितीची ‘लिटमस टेस्ट’  अमृत चौगुले, जनप्रवास राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकीकडे नव्याने बांधणीचे शिवधनुष्य पेलताना जयंत पाटील यांना जिल्ह्यात मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्याची जणू आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लिटमस टेस्टच ठरणार आहे. आतापर्यंत करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांना टप्प्यात येण्यापूर्वीच घरच्या मैदानात आऊट करण्याची फिल्डिंग लागणार हे उघड आहे. त्यामुळे आता राज्यापेक्षाही जिल्ह्यात राष्ट्रवादीला फुटीपासून रोखण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना एकसंध ठेवण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सन 1999 मध्ये काँग्रेस फुटीनंतर जिल्ह्यात काँग्रेसला तुल्यबळ राष्ट्रवादी बळकट होती व आजही आहे. अर्थात स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या पश्चात काँग्रेसची धुरा स्व.पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, स्व.मदनभाऊ पाटील यांनी सांभाळली होती, तर राष्ट्रवादीची जयंत पाटील, स्व.आर. आर.पाटील यांनी सांभाळली हो

राष्ट्रवादीत कार्याध्यक्ष पदाची केवळ घोषणाच, पक्षाच्या घटनेत अद्याप नोंदच नाही!

इमेज
शिवसेना कुणाची या प्रश्नाच्या उत्तरात गेली वर्षभर कायदेशीर काथ्याकूट सुरु होता..कोर्टात ती केस संपते ना संपते तोच आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न उपस्थित होतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा राष्ट्रवादीची  घटना चर्चेत येणार आणि कार्याध्यक्ष नावाचं पद जरी घोषित झालेलं असलं तरी पक्षाच्या घटनेत मात्र अद्याप त्यांची नोंद झालेली नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत झालं तेच राष्ट्रवादीबाबत होणार का? पक्ष कुणाचा हे ठरवताना खापर पक्षाच्या घटनेवरच फुटणार का? राष्ट्रवादीत दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती तर झाली पण मुळात या पदाला पक्षाच्या घटनेत अद्याप स्थान देण्यात आलेलं नाहीय. त्याआधीच पक्षातलं बंड झाल्यानं हे पद कायदेशीर लढाईत बिनकामाचं ठरणार असंच दिसतंय.  10 जून रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनात मोठी घोषणा झाली. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे या दोघांनाही कार्याध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं. पण ही केवळ घोषणा आहे जोपर्यंत पक्षाच्या घटनेत बदल करुन हे पद निर्माण केलं जात नाही तोपर्यंत त्या पदाला ना कुठला अर्थ ना अधिकार..राष्ट्रवादीची जी घटना निवडणूक आयोगाला प्राप्त आहे ती जुलै 2022

कोल्हापूरात सहकारात राजकीय फेरमांडणी होणार

इमेज
 राज्याच्या सत्ताधारी गटात राष्ट्रवादी अजितदादा गट समावेश झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, भाजप यांच्या बरोबरीने हाही पक्ष सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा, विधानसभा या निवडणुकांसह गोकुळ दुध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती येथेही राजकीय फेरमांडणी होणार असून त्यामध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्वाची असणार आहे. महाविकास आघाडी समोरील आव्हाने वाढली आहेत. अजित पवार यांच्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनीही शपथ घेतली. मुश्रीफ यांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. चंद्रकांतदादा पाटील यांनी तशी खुली ऑफर दिली होती. तेव्हा मुश्रीफ यांनी ‘शरद पवार एके शरद पवार’ असे म्हणत अढळ शरदनिष्ठा व्यक्त केली होती. त्यामुळे ते अजितदादांच्या बंडात दिसल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लोकसभा, विधानसभेवर परिणाम शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित आल्याने त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या रूपाने चांगलीच ताकद वाढली आहे. त्यांच्याबरोबर विनय कोरे व प्रकाश आवाडे

पवार साहेब की अजित दादा! दोन्ही गटाकडून फोनाफोनी सुरू; कार्यकर्ते संभ्रमात

इमेज
 पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी (छउझ) काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी कोणत्या गटासोबत राहायचं यावरुन चांगलीच गोची झाली आहे. पुणे हा पवार कुटुंबीयांचे होम ग्राऊंड असल्याने या पदाधिकार्‍यांचा (डहरीरव झरुरी) शरद पवार, अजित पवार  (Aक्षळीं झरुरी )आणि सुप्रिया सुळेंसोबत (र्डीिीळूर र्डीश्रश) थेट संपर्क आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास अवघड जात असल्याचे या पदाधिकार्‍यांनी म्हटलं आहे.  राष्ट्रादीचे पुणे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांच्या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित नव्हते आणि जेवढे होते त्यांच्यामधे देखील एकवाक्यता होऊ शकली नाही. एकीकडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पाठिशी उभा राहण्याचा  एकमुखी निर्णय घेण्यात आल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमधील चलबिचल उठून दिसणारी आहे. प्रदीप गारटकर काय म्हणाले? जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. 4 ते 5 तालुका अध्यक्षांशी उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. जिल्यातील इतर तालुक्यातील अध्यक्ष यांच्य

सोलापूरमध्ये अजित पवार यांनाच अधिक पाठबळ

इमेज
पक्षाच्या विरोधात अखेर बंडखोरी करून अजित पवार व अन्य ज्येष्ठ नेते मंडळी शिंदे मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची उरली सुरली ताकद संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात एकेकाळी मोठा दबदबा राहिलेल्या राष्ट्रवादीचे सध्या एका सहयोगी अपक्षासह तीन आमदार आहेत. या तिन्ही आमदारांनी शरद पवारांना पाठ दाखवून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर माजी आमदार, साखर कारखानदारांसह प्रस्थापित मंडळींनी अजित निष्ठा दाखवायला सुरुवात केल्यामुळे पक्षाचे भवितव्य धोक्यात आले आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी होते. सुधाकर परिचारक, दिलीप सोपल, करमाळ्याचे बागल ही जुनी मंडळीही राष्ट्रवादीत होती. परंतु नंतर अजित पवार यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे मोहिते-पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेले. त्यापाठोपाठ परिचारक यांनीही भाजपचा रस्ता धरला. दिलीप सोपल, बागल शिवसेनेत गेले. त्यांची पोकळी भरून निघत नसताना जिल्ह्यात पक्षाचा डोलारा माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, त्

अजित पवारांची खेळी; जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र

इमेज
जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधीपक्ष नेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले होते. तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आता पक्षविरोधी कारवाई केली म्हणून अजित पवार यांनी त्यांच्यावर कारवाई कऱण्यात यावी, यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे.  एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. पण ते काम हे विधानसभा अध्यक्षांचे आहे. ज्या विरोधी पक्षाची स र्वात जास्त संख्या असते त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात येते. आता जे काही करण्यात आलं ते आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं जात आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रफुल पटेल यांनी यावेळी जयंत पा

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे काय?

इमेज
मुश्रीफांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाचा चेहराच अडचणीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अजित पवारांच्या कळपात उडी घेतली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापना करताना कोल्हापूर जिल्ह्याने शंभर हत्तींचे बळ दिले त्याच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था पाहून अजित पवार चांगलेच संतप्त झाले होते. तेच अजित पवार आज समर्थक आमदारांसह भाजपच्या वळचणीला गेल्याने पक्ष आणखी रसातळाला गेला आहे. कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पाच आमदार आणि दोन खासदार अशी ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीचे आज केवळ दोनच आमदार आहेत, तेसुद्धा आता बाजूला झाल्याने कोल्हापुरातील नेतृत्वहीन झाले आहेत. त्यामुळे कैफियत तरी कोणाकडे मांडायची अशी स्थिती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्येकर्त्यांची आहे. आमदार हसन मुश्रीफांची अजित पवारांवरील निष्ठा कमी अन् ईडीने छळल्याचा त्रास त्यांची झोप उडवून देणारा होता. त्यामुळे शरद पवारांची सावली सोडून ते अजित पवरांच्या कळपात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, ज्यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आहे, ते ए. वा

अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांना नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आता सर्वच पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यांवर कारवाई सुरु केली आहे. अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांना नोटीस राज्यात राजकीय घडामोडी जोरात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कामाला लागले आहे. २०१९ मधील अजित पवार यांचे बंड शरद पवार यांनी मोडून काढले होते. आता पुन्हा तशीच तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांच्या गटात गेलेले काही लोक परत येत आहे. काही जणांवर कारवाई सुरु केली आहे. अजित पवार यांच्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व जणांना नोटीस देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिस्तभंगची कारवाई सुरु करण्यात आली आहे. कोणाला दिली नोटीस रविवारी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही शपथ घेतली. या सर्वांवर शिस्तभंगची कारवाई करण्याची प्रक्रिया राष्ट्रवादी

सुप्रिया सुळे अ‍ॅक्शन मोडमध्ये,

इमेज
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द होणार? सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. त्यामुळे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खासदारकी आगामी काळात खरंच रद्द होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेना सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या इतर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्यासह जे नेते सरकारमध्ये सामील झाले आहेत ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्याच्याशी पक्षाचा काहीच संबंध नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार स्वत: आता राजकीय मैदान

पक्ष, चिन्ह आमच्याबरोबर, मग नोटीस काढण्याचा अधिकार कोणाला? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाचे रुपांतर आता कायदेशीर लढाईत होणार आहे. शरद पवार यांनी पक्षातून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरे यांना बडतर्फे केले. त्याचवेळी नऊ जणांचा नोटीस देण्यासंदर्भात अजित पवार यांनी भूमिका मांडली. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढणार असल्याचे चित्र आज दिसून आले. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फे केले तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी नऊ जणांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही लढाई कायद्याची लढाई होणार आहे. काय म्हणाले अजित पवार अजित पवार यांनी सांगितले की, पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्यासोबत आहे. त्यामुळे नोटीस काढण्याचा अधिकार कोणाला नाही. आमच्या नऊ जणांना ते नोटीस काढू शकत नाही. आताच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सर्वच अधिकार असणार आहे. नोटीस काढण्याचा प्रकार म्हणजे आमच्या आमदारांना घाबरवण्याचा प्रकार आहे. परंतु सर्वच आमदार आमच्यासोबत आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी