पोस्ट्स

sangli local politics लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

इमेज
बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा. अमोल कुलकर्णी  गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्

सांगलीत भाजप सुसाट, काँग्रेसमध्ये मतभिन्नता

इमेज
आ. सुधीर गाडगीळ यांची विकास कामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल  अनिल कदम जनप्रवास  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप सुसाट असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभिन्नता असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी सांगली शहरासह ग्रामीण भागात कामांचा सपाटा लावला आहे. रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सांगली-पेठ रस्ता, कवलापूर विमानतळाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. जनसंपर्काच्या माध्यमातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे गाडगीळ विधानसभेतील मार्ग सुकर असल्याचे चित्र दिसून येते. भाजपचे सांगली मतदारसंघातील आमदार गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे आठ वर्षापुर्वी कुणालाही वाटले नव्हते. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ

इमेज
अमृत चौगुले भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे.  उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ

राज्याच्या स्थापनेपासून जत, आटपाडीत मंत्रीपदाचाही दुष्काळ

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास   राज्याच्या राजकारणात गेल्या आठवड्यात मोठा भूकंप झाला आणि एका रात्रीतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले. मंत्रीपद मिळणे हा नशिबाचा आणि कर्तृत्वाचा भाग असला तरी सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्याला मात्र पाण्याच्या दुष्काळाबरोबर मंत्रीपदाचा दुष्काळही जाणवत आहे. कारण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून गेल्या 64 वर्षामध्ये अजून जत आणि आटपाडी तालुक्याला मंत्रीपदच मिळाले नाही. मंत्रीपदाचा हा दुष्काळ अनिल बाबर किंवा गोपिचंद पडळकर यांच्या रूपाने संपतो की काय हे येणार्‍या मंत्रीमंडळाच्या विस्तारातच समजेल. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1961 रोजी रोजी.  यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळाला. त्या अगोदर सांगली जिल्ह्याचा मुंबई प्रांतात समावेश होता. मुंबई प्रांताची निवडणूक मात्र 1952 पासून होत होती. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत विटा, खानापूर, आटपाडी मध्ये दोन जागा होत्या. या दोन्ही जागेवर लक्ष्मण भिंगारदेवे आणि दत्ताजीराव देशमुख निवडून आले. त्याचवेळी जतमधून विजयसिंहराजे डफळे अपक्ष म्हणून निवडून आले.  त्यानंतर पाच वर्षानी

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी