पोस्ट्स

विशेष लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

अशोक चव्हाणांनी ’राज्य’मार्ग पकडल्याने नारायण राणेंना कोकणातून ’लोक’मार्ग पकडावा लागणार!

इमेज
 अशोक चव्हाणांनी ’राज्य’मार्ग पकडल्याने नारायण राणेंना कोकणातून ’लोक’मार्ग पकडावा लागणार! मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती विरोधात महाप्लॅन सुरू असतानाच अशोक चव्हाण काँग्रेसकडून सर्व बैठकांमध्ये हजर होते. मात्र तेच अशोक चव्हाण आता भाजपमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली. त्यामुळे देव पाण्यात घालून बसलेल्यांना आता पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे.  नारायण राणेंचा राज्यसभेतून पत्ता कट  दुसरीकडे भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा धक्का बसला असून त्यांचा राज्यसभेतून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित समजली जात आहे. उमेदवारी मिळाल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठ

पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न

इमेज
 माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर दिल्ली : काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाऊंटवर पंतप्रधान मोदी यांनी तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आ

सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ,

इमेज
 सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ, ’पाणीदार’ आमदार अनिल बाबर आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.  पाणीदार आमदार -  पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. तसा खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त.  कृष्णा खोर्‍यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. 2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सरपंच ते चार वेळा आमदार, मंत्रिपदाची हुलकावणी -  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.  2019 मध्ये शिवसेनेच्

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश

इमेज
 वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होते. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभे केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र अखेर आज वंचितचा मविआत समावेश करत असल्याचे पत्र जारी करण्यात आले.  गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हा़वे, यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचे या पत्रात म्हटलं आहे.  महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्यावतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.  वंचितची महाविकास आघाडीमध्

पंकजा मुंडे, विनोद तावडे, मिलिंद देवरा राज्यसभेसाठी चर्चेत

इमेज
 पंकजा मुंडे, विनोद तावडे, मिलिंद देवरा राज्यसभेसाठी चर्चेत राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज; पाच जागांसाठी रणनीती मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. महायुतीने तशी तयारी देखील सुरू केली असून, पाच जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे.  निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.  राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम ज

नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला

इमेज
इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शहांशी भेटून भाजपशी बोलणी;  नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला पाटणा  : नवीन पात्रं येत आहेत, पण जुने नाटक चालू आहे प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांच्या या ओळी बिहारच्या राजकारणावर अगदी चपखल बसतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच राहणार आहेत. नितीश कुमार यांनी आज रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.  दीड महिन्यापूर्वी स्क्रिप्ट लिहिली गेली  2022 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी दुसर्‍यांदा भाजप सोडला आणि आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले की त्यांना मरायला आवडेल पण भाजपसोबत जाणार नाही. नितीशकुमारांसाठी हे गेट कायमचे बंद होणार असल्याचेही भाज

नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!

इमेज
 नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी! सकाळी राजीनामा, दुपारी पाठिंब्याचं पत्र, संध्याकाळी पुन्हा शपथ;  पाटणा :  कालपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते. नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे

महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार!

इमेज
 नारायण राणे ते अनिल देसाई कार्यकाळ संपणार!  देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग आणि दुसरीकडे राज्यसभेतून 2024 वर्षात तब्बल 68 राज्यभसा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करुन निवृत्त होणार्‍या खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार हे उत्तर प्रदेशातील आहेत. तर, महाराष्ट्रातील 6 खासदार महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत.    राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्य

जयंत पाटलांपुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव साळुंखे यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल. सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा

मिरज पॅटर्न सक्रीय

इमेज
 उदय रावळ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आता आपल्या प्रभागातील विकास कामांना गती देत आहेत. गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा समोर ठेवण्यासाठी जनतेसमोर जावं लागणार आहे. त्यामुळे कामे लवकर संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु आत्तापासूनच गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. म्हणजेच मिरज पॅटर्न सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. महापालिका नगरसेवकांची मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे. तसतसे नगरसेवक आता अनेकांच्या चौकटीसमोर उभे दिसत आहे. भाऊ, काका, दादा, साहेब, मावशी, काकू, तात्या असा उपाद्या देवून गोंजरण्याचे नाटक आता सुरू झाले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय नाट्याचा प्रयोग पाहत अनेक  विद्यमान नगरसेवकांनी लॉगींग सुरू केली आहे. मिरज पॅटर्न प्रमाणे दादा, भाऊ, साहेब गट तयार होत आहे. मिरजेत झालेल्या लक्ष्मी मार्केटमधील आयलॅड उद्घाटनावेळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, कॉंग्रेसचे विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्ती राज्य अध्यक्ष समित कदम हे सर्वजण कार्यक्रमानिमित्त

जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा वेट अ‍ॅण्ड वॉच

इमेज
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर,  अनिल कदम  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जुलैमध्ये होणार असली तरी सुनावणी झाली तरी पावसाळ्यात या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबणीवर पडत आहेत. यापूर्वी आरक्षण पडलेले आरक्षण बदलणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या कारणांमुळे दिवाळीचा फराळ खाऊनच उमेदवार राजकीय आखाड्यात उतरतील, असे चित्र दिसत आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या असून, त्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. एप्रिल महिन्यात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. निवडणूक घेण्याबाबत यावेळी तरी नक्कीच काहीतरी निर्णय येईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड

जिल्ह्यात जयंत पाटीलच किंग: अजितदादांच्या गळ्याला लागेनात नेते

इमेज
शरद पवळ  सांगली: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली.

मुंबईचा फौजदार काळाच्या पडद्याआड

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे ब्रिटीशांनाही लाजविणार्‍या, आपल्या रूबाबदार व्यक्तिमत्वाने मराठी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी राज्य करणारा रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड गेला. जिवनात मरण अटळ असले तरी रविंद्र महाजनीला जसे मरण आले तसे वैर्‍याच्या वाट्यालाही येउ नये. मुंबईचा फौजदार बेवारस अवस्थेत गेला, असेच म्हणावे लागले. रमेश देव, राजा गोसावी, राजा परांजपे यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी तग धरत होती. सर्वच मराठी चित्रपटांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. सत्तरच्या दशकात रवींद्र महाजनी यांनी अखंड महाराष्ट्र हलवून सोडले होते. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम है हे त्याचे गाजलेले चित्रपट. त्यावेळी आत्ताच्यासारखे मल्टीप्लेक्स नव्हते, मोबाईल क्रांती नव्हती. तरीही गावोगावच्या जत्रेत आणि यात्रेत तंबूमध्ये मराठी चित्रपट दाखविले जात होते. अशा याकाळात एका सर्वसामान्य कुटुंबातून येउन मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारा रविंद्र महाजनी तरूण आणि तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याचे सर्वच चित्रपट हिट झाले. परंतु मुंबईचा फौजदार आणि देवता हे तर सुपरहिट ठरले. नोकरी न लागलेला तरूण हातात कुर्‍हाड घेउन वाममार्

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात, मानेंची एंट्री

इमेज
 दिनेशकुमार ऐतवडे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.  जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती कर

सदाशिवराव पाटील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी डिजीटल बॅनरद्वारे व्यक्त केल्या भावना

इमेज
  "आता वेळ निर्णयाची"  भूमिकेकडे लागल्या नजरा प्रताप मेटकरी : जनप्रवास विटा         राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि ॲड. सदाशिवराव पाटील यांचे छायाचित्र असलेल्या डिजीटल बॅनरवर "आता वेळ निर्णयाची, जे संकटात आपल्यासोबत आपण जाऊ त्यांच्यासोबत" अशा शब्दांत भावना व्यक्त करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या लक्षवेधी बॅनरमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.        सध्या राज्याच्या राजकारणामध्ये  धक्कादायक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा कार

जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई

इमेज
 जयंतरावांची जिल्ह्यातच अस्तित्वाची लढाई महाविकास आघाडी मजबुतीची मदार : जिल्हा परिषद, पंचायत समितीची ‘लिटमस टेस्ट’  अमृत चौगुले, जनप्रवास राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकीकडे नव्याने बांधणीचे शिवधनुष्य पेलताना जयंत पाटील यांना जिल्ह्यात मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्याची जणू आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लिटमस टेस्टच ठरणार आहे. आतापर्यंत करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांना टप्प्यात येण्यापूर्वीच घरच्या मैदानात आऊट करण्याची फिल्डिंग लागणार हे उघड आहे. त्यामुळे आता राज्यापेक्षाही जिल्ह्यात राष्ट्रवादीला फुटीपासून रोखण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना एकसंध ठेवण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सन 1999 मध्ये काँग्रेस फुटीनंतर जिल्ह्यात काँग्रेसला तुल्यबळ राष्ट्रवादी बळकट होती व आजही आहे. अर्थात स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या पश्चात काँग्रेसची धुरा स्व.पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, स्व.मदनभाऊ पाटील यांनी सांभाळली होती, तर राष्ट्रवादीची जयंत पाटील, स्व.आर. आर.पाटील यांनी सांभाळली हो

जयंत पाटलांना घेरण्यासाठी राहूल महाडिकांची तयारी

इमेज
दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास राज्यात नुकताच मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सत्तेत सहभागी होत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. अजित पवारांचे पुढचे टार्गेट आमदार जयंत पाटील हेच असणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना जिल्ह्यातच रोखण्यासाठी आत्तापासूनच रणनिती आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेठचे रा हूल महाडिक यांनी नुकताच अजित पवार यांची मुंबईत भेट घेउन त्यांचा सत्कार केला. विरोधकांमध्ये आजपर्यंत कधीच एकमत झाले नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत राहूल महाडिक यांचे नाव सर्वसंमतीने पुढे येण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांना जर मतदार संघातच रोखून धरायचे असेल तर राहूल महाडिक यांच्याशिवाय पर्याय नाही, असे विरोधकांमध्ये एकमत झाल्याचे कळत आहे. राहूल महाडिक यांनीही जयंत पाटील यांना घेरण्याची तयारी केली आहे. 1990 पासून इस्लामपूर मतदार संघात आपली मजबूत पकड निर्माण केलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणातही मोठी झेप घेतली. सध्याच्या घडीला राज्यस्तरावर त्यांचे नाव घेतले जाते. शरद पवार यांचे अगदी विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांच्याकड

*विधान सभा बरखास्त करायला हवी*

इमेज
महेश खराडे, सांगली छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र या महाराष्टाचे नेतृत्व स्व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी केले. महारास्ट्रातील राजकारणाला दिशा दिली. राजकारणाचा पाया घातला. महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे सुसंस्कृत राजकारण अशी परंपरा होती. पण याला पहिला छेद दिला शरद पवारांनीच. 1978 साली, वसंतदादा चे सरकार पाडून ते मुख्यमंत्री झाले ,त्यानंतर त्यांनी  शिवसेना फोडली छगन भुजबळांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला 99 साली पुन्हा शरद पवारांनी सोनिया गांधीचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना केली राज्याचे राजकारण चार पक्षीय झाले 1999 ते 2014 पर्यंत राजकारणाचा स्तर ढासळत होता पण तरीही  राजकारणाचा दर्जा फारसा घसरला नव्हता . पण 2014 नंतर देशात आणि राज्यात   भाजपा  सरकार आले त्यानंतर मात्र देश आणि राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरायला लागला फोडाफोडी ला    जोरदार प्रारंभ झाला  केंद्रातील भाजपा सरकारने  भ्रष्ट नेत्यांवर  इडी सीबीआय इन्कम टॅक्स  धाडी  टाकायली सुरुवात केली . देश आणि राज्याला राजकारणी नेते , प्रशासकिय अधिकारी आ

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी