पोस्ट्स

लोकसभा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार?

इमेज
 मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार?  भाजप संकटमोचकाच्या वक्तव्यानं माढ्यात चर्चा माढा : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वपक्षीय नेत्यांची तारांबळ उडालीय. उमेदवार प्रचाराच्या नियोजनात गुंतलेत, तर काही नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आटापिटा करतायत. मात्र, माढ्यात महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय. रणजीतसिंह निंबाळकरकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि इच्छुकांच्या गोटात नव्या हालचाली सुरू झाल्या. मोहिते पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून लढण्यास इच्छुक होते. तर विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक  मानले जातात. आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीविरोधात मोहिते पाटील आणि निंबाळकर एकवटल्याचं दिसून येतंय. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासू गिरीश महाजन यांना अकलूजला पाठवलं, पण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत नाराजी आणि संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांची

ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल

इमेज
 ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल मुंबई: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे. या ओपनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, तर 20 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. महाविकास आघाडीचा 20 जागांवरील विजय हा महायुतीसाठी मोठा धक्का ठरू शकतो. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, महायुतीमध्ये असणार्‍या भाजपला 22 जागांवर विजय मिळेल. तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला मिळून फक्त 6 जागा जिंकता येतील. याउलट महाविकास आघाडीत  काँग्रेसचे 4 खासदार विजयी होतील. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण 16 खासदार विजयी होतील. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या खासदारांचा एकूण आकडा 20 वर जाईल, असा निष्कर्ष या ओपिनियन पोलमधून पुढे आला आहे. 2019 साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 4 वर जाईल. तर गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळवला होता. पण 2024 च्य

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावे

इमेज
 भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावे नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या  यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे.  नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  कुणाकुणाची तिकीटं कापली?  भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यस

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत,

इमेज
 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत,  मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. मातोश्री या ठिकाणी आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी चंद्रहार पाटील त्यांच्या समर्थकांसह आले होते. त्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांच्या मुलाचा सन्मान केला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार पाटील काय म्हणाले? मला आज मनापासून उद्धव ठाकरेंचे आभार मानायचे आहेत. एका शेतकर्‍याचा मुलाला तुम्ही जो सन्मान केलात त्याबद्दल मी आभार मानतो. मी आज जास्त काही बोलणार नाही. पण खात्रीने सांगेन की लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातला आपला पहिला निकाल असेल. एका शेतकर्‍याच्या मुलाला एवढ्या मोठ्या कुटुंबात सहभागी करुन घेतलंत त्यामुळे मी आभार मानतो. तसंच यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना गदाही भेट दिली आणि त्यानंतर हाती शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या स

आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ

इमेज
आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विशाल पाटील स्पष्टच बोलले पलूस : आगामी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे काँग्रेसने सांगलीतून न उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये जातील, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत विशाल पाटलांचे नाव असल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. परंतु, विशाल पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे. पण मला जर काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले. ते रविवारी पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार  भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र, आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्ष्या गल्लीत बसतोय  आणि दररोज तासगाव-सांगली कर

राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं,

इमेज
 राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं,  हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला? मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिनसलय. ठाकरे गट उमेदवार देणार असल्याने राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची आज 10 मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन मतविभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली जाणार

युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट;

इमेज
 युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट;  बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर कोलकत्ता : देशभरातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावं आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार नुसरत जहा यांना मात्र पक्षाकडून आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच, दिग्गज क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर, बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीनं महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.  नुसरत जहाँ यांचा पत्ता कट, तर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा रिंगणात  तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये

कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु!

इमेज
 कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु!   शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांचा पत्ता कट होणार? कोल्हापूर एबीपी माझा :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  महायुतीमध्ये जागा वाटपावरून नाराजीचा सूर सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तोच खेळ सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी होणार की नाही? ही चर्चा एका बाजूने असतानाच दुसर्‍या बाजूला महायुतीमध्ये शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा मिळणार तरी किती? याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, जागा मिळाल्या तरी त्या कोणत्या असणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात येत असली तरी अजूनही सन्मानजनक तोडगा निघालेला नाही. जागावाटपावरून अजित पवार गट आणि शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. जागाच देणार नसतील, तर चर्चा तरी कशाला? असाच सूर दोन्ही गटात आहे.  भाजपकडून एकेरी जागा वाटणीला येणार असल्याची चर्चा असल्याने सुद्धा नाराजीत भर पडली आहे. दुसरीकडे, पक्ष तुमचा चिन्ह आमचे असाही प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याने दोन्ही गटातील नेत्यांची नाराजी आणखी वाढली आहे. महायुती

शिंदेंना 10-12, अजितदादांना 3-4 जागा, अमित शाहांचं गणित मतदारांना पटणार का?

इमेज
 शिंदेंना 10-12, अजितदादांना 3-4 जागा, अमित शाहांचं गणित मतदारांना पटणार का?  मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरून महायुतीतील तिढा अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यासाठी दिल्ली गाठावी लागली. अमित शाह यांच्यासोबत अनेक तास बैठका होऊनही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुतीचं घोडं नेमक अडलंय कुठे? भाजपचा शिंदेंच्या कोणत्या जागांवर दावा आहे? अजित पवारांना किती जागा मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं ही जागावाटपानंतर मिळणार आहेत. चार पॉवरफुल्ल नेत्यांना तिढा सोडवणं अवघड रात्री साडे दहा ते पहाटे एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील तीन बलाढ्य नेते आणि देशातील क्रमांक दोनचे शक्तिशाली समजले जाणारे अमित शाह यांनी बैठक घेतली. पण अशा पॉवरफुल मंडळींना एक प्रश्न सोडवणं सध्या अवघड झालाय आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असे सगळेजण शुक

बारामतीमध्ये शरद पवारांनी पहिला डाव टाकला

इमेज
 बारामतीमध्ये शरद पवारांनी पहिला डाव टाकला ,  एका भेटीत 40 वर्षांचा संघर्ष संपवला पुणे : बारामती लोकसभेसाठी दोन्ही पवार गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. अजित पवारांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत होतं, पण आता शरद पवारांनी आपला पहिला डाव टाकलाय. शरद पवारांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांच्या भोरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. थोपटे यांच्यासोबतचा गेल्या 40 वर्षांपासून असलेला संघर्ष मिटवण्यासाठी भोरमध्ये जाणीवपूर्वक पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं.  बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात आज सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पुढाकारातून या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.  चाळीस वर्षांच्या संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न  भोरमधील सभेआधी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

इमेज
 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर राहुल गांधी ‘या’ जागेवरून निवडणूक लढवणार! आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसनेही आज (8 मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण 39 उमेदवारांची नावे असून यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण 39 नेत्यांचा समावेश आहेत. याच पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. राहुल गांधींना काँग्रेसने वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 2019 साली त्यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र ते पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातून

शिंदेंसोबत आलेल्या 13 खासदारांचं काय होणार? शिवसेनेला केवळ आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता!

इमेज
 शिंदेंसोबत आलेल्या 13 खासदारांचं काय होणार? शिवसेनेला केवळ आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता! मुंबई : राज्यातील महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेवर दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं होत असून ती अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय. त्यामध्ये भाजपकडून राज्यात 32 जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसतंय. अजित पवार गटासोबत दोन खासदार असल्याने त्यांचं जास्त काही नुकसान होणार नाही, पण शिंदे गटाचं काय असा प्रश्न विचारला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंना सोडून आलेल्या 13 खासदार असून त्यांच्यातील काही जणांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही असं बोललं जातंय. दिल्लीत भाजपची जागावाटपावर चर्चा राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये फक्त भाजप नेत्यांचा समावेश आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते, त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकना

भाजपचं ठरलं! लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, ही आहे संभाव्य उमेदवारांची यादी

इमेज
 भाजपचं ठरलं! लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, ही आहे संभाव्य उमेदवारांची यादी मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी एक मोठी बातमी समोर येत असून भाजप 48 पैकी 32 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं समोर आले आहे. भाजपा या 32 जागांवर ठाम असून, काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे.  अशी असू शकते भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी, 1. पुणे : मुरलीधर मोहोळ. 2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता. 3. हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता. 4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता. 5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता. 6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार. 7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत. 8. अकोला : संजय धोत्रे 9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक  10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या

लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता

इमेज
 लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता  14-15 मार्चला तारखा जाहीर होणार? नवी दिल्ली :  निवडणूक आयोगाकडून 14 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 प्रमाणेच यंदाही सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे.  16 जून 2024 रोजी 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्या दिवसापासूनच आचरसंहिता लागू होईल.  दरम्यान, सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्याचा दौरा करुन आढावा घेत आहेत. सर्व राज्यातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार.. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही

इमेज
 सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार.. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही ..  पृथ्वीराज पाटील :मुंबईत मंगळवारच्या बैठकीत भूमिका मांडणार.. सांगली दि.3: सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे. एक अपवाद वगळता सातत्याने सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे.  सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार.. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड दोन वर्षापासून जोरदार तयारी सुरू आहे. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा निवडणुक लढणार. त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे. हे आम्ही प्रदेश कमिटीसमोर यापूर्वी मांडले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदार संघ आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील घडामोडीसाठी सांगली काँग्रेसवर अन्याय होता कामा नये. सन 2019 मध्ये सांगली लोकसभा सीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणे ही चूक झाली होती. झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. आगामी निवडणुकीत सांगलीच्या लोकसभेची सीट काँग्रेसनेच लढवली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल

हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून स्वतंत्रपणे लढवणार : राजू शेट्टी

इमेज
 हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून स्वतंत्रपणे लढवणार : राजू शेट्टी  इस्लामपूर ः प्रतिनिधी हातकणंगले लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतूनच लढवणार आहे. शेतकर्‍यांच्या जीवावर स्वतंत्रपणे एक नोट व एक वोट या तत्त्वावर 22 वर्षानंतर सुद्धा मतदारसंघात आपल्याला निवडणुकीत उमेदवाराला पैसे द्यावे लागतात. हा विश्वास मतदारांच्यात जागृत ठेवला ही गोष्ट अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन माजी खा.राजू शेट्टी यांनी केले.  तांबवे ता.वाळवा येथे हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबीरप्रसंगी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर येथे महामार्ग रोखल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 15 लाख शेतकर्‍यांना 650 कोटी रुपये मिळवून दिले आहेत. माझी निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शेतकरी हातात घेणार आहे.  त्यामुळे मला निवडणुकीची काळजी नाही. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, अ‍ॅड.एस.यु.संदे, शिवाजीराव पाटील, संदिप राजोबा, संजय बेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.संजय थोरात म्हणाले, शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर व्यापक जनजागृती करण्यात स्वाभिमानी शेतकरी

सांगलीतील वंचितकडून चंद्रहार पाटील

इमेज
 सांगलीतील वंचितकडून चंद्रहार पाटील प्रकाश आंबेडकरांकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर  अकोला: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असल्याच्या बातम्याही अधुनमधून येत होत्या. मात्र, मविआ आणि वंचितचे जागावाटपाचे सूत्र निश्चित होऊ शकले नव्हते. परंतु, आता प्रकाश आंबेडकर यांनी परस्पर लोकसभेच्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. त्यामुळे आता वंचित आणि मविआतील बोलणी फिस्कटल्याचे दिसत आहे. आता मविआला प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यात यश न मिळाल्यास 2019 प्रमाणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा ’एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसेल. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी लोकसभेच्या तीन जागांवरील वंचितचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर लढतील. तर वंचितकडून वर्धा येथे प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर,

इमेज
 भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर,  मोदी-शाहांकडून कोणाला संधी? नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195   उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसर्‍यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठ

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ

इमेज
अमृत चौगुले भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे.  उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी