पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त

इमेज
 विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त प्रसिद्ध जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ’आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे जाऊन आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती. डोंगरगडमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माँ बामलेश्वरी मंदिरातही मोदींनी पूजा केली होती. वर्षानुवर्षे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथी

जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,

इमेज
जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,  77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर डोंगरगड : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमधील सदलगा येथे झाला होता.  संत आचार्य विद्यासागर महाराजांनी घेतली समाधी दिगंबर जैन आचार्य होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच्यावर रविवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  आज पंचतत्वात होणार लीन जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री 2.30 वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचे निधन झाले. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-ज

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

इमेज
 विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार गोंदिया : जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या  गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा जवळील पानगाव येथे हा भीषण अपघात झाला. पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये गाडी कोसळली असून कालव्यामध्ये पाणी असल्याने यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे भाविक जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातात तिघे जागीच ठार दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्य दर्शनाला  जात असताना हा अपघात झाला आहे. मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक काल, 17 फेब्रुवारीला रात्री निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये त्यांची कार कोसळली. दरम्यान का

अशोक चव्हाणांनी ’राज्य’मार्ग पकडल्याने नारायण राणेंना कोकणातून ’लोक’मार्ग पकडावा लागणार!

इमेज
 अशोक चव्हाणांनी ’राज्य’मार्ग पकडल्याने नारायण राणेंना कोकणातून ’लोक’मार्ग पकडावा लागणार! मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती विरोधात महाप्लॅन सुरू असतानाच अशोक चव्हाण काँग्रेसकडून सर्व बैठकांमध्ये हजर होते. मात्र तेच अशोक चव्हाण आता भाजपमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली. त्यामुळे देव पाण्यात घालून बसलेल्यांना आता पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे.  नारायण राणेंचा राज्यसभेतून पत्ता कट  दुसरीकडे भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा धक्का बसला असून त्यांचा राज्यसभेतून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित समजली जात आहे. उमेदवारी मिळाल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठ

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल

इमेज
 राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल  मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रफुल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सर्व तांत्रिक बाबी तपासून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. प्रफुल पटेल निवडून आल्यानंतर ते आपल्या आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर मे महिन्यात प्रफुल पटेल यांच्या आधीच्या टर्मसाठी मे महिन्यात पुन्हा निवडणूक होईल. तेव्हा भाजपा आणि शिवसेनेशी चर्चा करून, त्या जागेबाबत निर्णय घेऊ, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष उद्या 15 फेब्रुवारी रोजी आपला निकाल जाहीर करतील. आम्ही जी काही कायदेशीर बाजू होती, ती मांडलेली आहे, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे तिथेही आम्ही कायदेशीर लढाई लढण्याची तयारी ठेवली आहे, असेह

हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका

इमेज
 हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका इचलकरंजी : खासदारांनी आत्तापर्यंत काय केले? भाजपच्या लोकांशी बोलताना लोक त्यांना बदला असे म्हणतात, अशी टीका भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली. या टिकेला पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये उत्तर देऊ, अशी भूमिका खासदार माने यांनी बुधवारी व्यक्त केली. शिरदवाड (ता. शिरोळ) येथे विकास कामांच्या उद्घघाटन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. यावेळी आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इकडे भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत आवाडे यांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना चिमटा काढला. लोक म्हणतात; आम्ही नाही देशात तिसर्‍यांदा मोदी हेच पंतप्रधान होणार. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. परंतु इथे खासदार कोण आहेत. त्यांनी या भागाचा आतापर्यंत काय दिले याचे उत्तरे लोक मागत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काहीतरी निर्णय घेतील. आम्ही काही कोणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्

पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न

इमेज
 माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर दिल्ली : काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाऊंटवर पंतप्रधान मोदी यांनी तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आ

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी