SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

शिरदवाड (ता. शिरोळ) येथे विकास कामांच्या उद्घघाटन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. यावेळी आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इकडे भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत आवाडे यांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना चिमटा काढला.
देशात तिसर्यांदा मोदी हेच पंतप्रधान होणार. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. परंतु इथे खासदार कोण आहेत. त्यांनी या भागाचा आतापर्यंत काय दिले याचे उत्तरे लोक मागत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काहीतरी निर्णय घेतील. आम्ही काही कोणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहणार आहे, असेही आवाडे म्हणाले.
आमदार यड्रावकर महाविकास आघाडीत मंत्री होतात. तुमचा आम्हाला कधी त्रास झाला नाही. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी आम्हाला खूपच त्रास दिला. त्यातील एक मंत्री मुश्रीफ आता आमच्या सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांचा त्रास आता कमी झाला आहे, असे म्हणत आवाडे यांनी सतेज पाटील यांच्यावरही टीका केली.
दरम्यान, आवाडे यांची ही राजकीय टोलेबाजी म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघात पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी केलेली रणनीती असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या संभाषणाची चित्रफीत समाज माध्यमात अग्रेषित होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा