MY POSTS
विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त
प्रसिद्ध जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
’आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे जाऊन आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती. डोंगरगडमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माँ बामलेश्वरी मंदिरातही मोदींनी पूजा केली होती.
वर्षानुवर्षे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी जैन मंदिराला दिलेली भेट मी कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी मी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्यासोबत वेळ घालवला होता आणि त्यांचे आशीर्वादही घेतले होते, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा