पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार?

इमेज
 मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार?  भाजप संकटमोचकाच्या वक्तव्यानं माढ्यात चर्चा माढा : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वपक्षीय नेत्यांची तारांबळ उडालीय. उमेदवार प्रचाराच्या नियोजनात गुंतलेत, तर काही नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आटापिटा करतायत. मात्र, माढ्यात महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय. रणजीतसिंह निंबाळकरकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि इच्छुकांच्या गोटात नव्या हालचाली सुरू झाल्या. मोहिते पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून लढण्यास इच्छुक होते. तर विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक  मानले जातात. आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीविरोधात मोहिते पाटील आणि निंबाळकर एकवटल्याचं दिसून येतंय. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासू गिरीश महाजन यांना अकलूजला पाठवलं, पण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत नाराजी आणि संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांची

ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल

इमेज
 ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल मुंबई: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे. या ओपनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, तर 20 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. महाविकास आघाडीचा 20 जागांवरील विजय हा महायुतीसाठी मोठा धक्का ठरू शकतो. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, महायुतीमध्ये असणार्‍या भाजपला 22 जागांवर विजय मिळेल. तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला मिळून फक्त 6 जागा जिंकता येतील. याउलट महाविकास आघाडीत  काँग्रेसचे 4 खासदार विजयी होतील. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण 16 खासदार विजयी होतील. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या खासदारांचा एकूण आकडा 20 वर जाईल, असा निष्कर्ष या ओपिनियन पोलमधून पुढे आला आहे. 2019 साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 4 वर जाईल. तर गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळवला होता. पण 2024 च्य

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावे

इमेज
 भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावे नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या  यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे.  नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  कुणाकुणाची तिकीटं कापली?  भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यस

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत,

इमेज
 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत,  मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. मातोश्री या ठिकाणी आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी चंद्रहार पाटील त्यांच्या समर्थकांसह आले होते. त्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांच्या मुलाचा सन्मान केला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार पाटील काय म्हणाले? मला आज मनापासून उद्धव ठाकरेंचे आभार मानायचे आहेत. एका शेतकर्‍याचा मुलाला तुम्ही जो सन्मान केलात त्याबद्दल मी आभार मानतो. मी आज जास्त काही बोलणार नाही. पण खात्रीने सांगेन की लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातला आपला पहिला निकाल असेल. एका शेतकर्‍याच्या मुलाला एवढ्या मोठ्या कुटुंबात सहभागी करुन घेतलंत त्यामुळे मी आभार मानतो. तसंच यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना गदाही भेट दिली आणि त्यानंतर हाती शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या स

आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ

इमेज
आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विशाल पाटील स्पष्टच बोलले पलूस : आगामी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे काँग्रेसने सांगलीतून न उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये जातील, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत विशाल पाटलांचे नाव असल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. परंतु, विशाल पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे. पण मला जर काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले. ते रविवारी पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार  भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र, आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्ष्या गल्लीत बसतोय  आणि दररोज तासगाव-सांगली कर

राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं,

इमेज
 राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं,  हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला? मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिनसलय. ठाकरे गट उमेदवार देणार असल्याने राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची आज 10 मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन मतविभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली जाणार

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी