MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत,



 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत, 

मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. मातोश्री या ठिकाणी आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी चंद्रहार पाटील त्यांच्या समर्थकांसह आले होते. त्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांच्या मुलाचा सन्मान केला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे.

चंद्रहार पाटील काय म्हणाले?

मला आज मनापासून उद्धव ठाकरेंचे आभार मानायचे आहेत. एका शेतकर्‍याचा मुलाला तुम्ही जो सन्मान केलात त्याबद्दल मी आभार मानतो. मी आज जास्त काही बोलणार नाही. पण खात्रीने सांगेन की लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातला आपला पहिला निकाल असेल. एका शेतकर्‍याच्या मुलाला एवढ्या मोठ्या कुटुंबात सहभागी करुन घेतलंत त्यामुळे मी आभार मानतो. तसंच यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना गदाही भेट दिली आणि त्यानंतर हाती शिवबंधन बांधलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या सर्वांचे मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो आहे. माझी छाती आज अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली आहे ते काय मी सांगू शकत नाही. या मर्दाची छाती पाहिल्यावर सांगलीत कुणी समोर येणार नाही. पक्षातले नामर्द पळून गेले आहेत. मात्र मर्द शिवसेनेत येत आहेत. मारुती माने माझ्या लहानपणी घरी यायचे ते दिवस आठवले. आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी तुमचं स्वागत करतो. लोकांनी सगळं ठरवलं आहे.. की तुम्हाला सांगलीतून उभं करायचे त्यामुळे तुम्हाला वेगळे संकेत काय द्यायचे.


गदा आणि मशाल घेऊन आपल्या मर्द दिल्लीत पाठवयाचा आहे


आपल्याला गदा आणि मशाल घेऊन आपल्याला सांगलीतला मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. सांगलीत बरीच वर्षे मी आलो नाहीये आता मी येणार. गद्दारांनाच आता आडवं करायचं आहे. हुकूमशाही विरुद्ध लढताना मर्द, पैलवान शिवसेनेत आले आहेत. संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने पाहते आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास दृढ झाला असेल की आमच्यासाठी लढणारे मर्द आहेत. मी आता विजयाच्या सभेसाठी सांगलीत येणारच. आपल्याला विजय मिळवावाच लागेल. त्या लढाईसाठी मी शुभेच्छा देतो. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी