MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार?



 मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार? 

भाजप संकटमोचकाच्या वक्तव्यानं माढ्यात चर्चा


माढा : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वपक्षीय नेत्यांची तारांबळ उडालीय. उमेदवार प्रचाराच्या नियोजनात गुंतलेत, तर काही नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आटापिटा करतायत. मात्र, माढ्यात महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय. रणजीतसिंह निंबाळकरकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि इच्छुकांच्या गोटात नव्या हालचाली सुरू झाल्या. मोहिते पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून लढण्यास इच्छुक होते. तर विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक 

मानले जातात. आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीविरोधात मोहिते पाटील आणि निंबाळकर एकवटल्याचं दिसून येतंय. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासू गिरीश महाजन यांना अकलूजला पाठवलं, पण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत नाराजी आणि संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांची समजूत काढताना महाजन यांनी केलेल्या विधानाची माढ्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. 

भाजप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकिट कापणार का? या चर्चेला वेग आला. मोहिते पाटील कार्यकर्त्यांची समजूत काढताना महाजन यांनी अजून वेळ गेलेली नाही, वरिष्ठांकडे तुमची नाराजी पोहचवतो, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर माढ्याच्या राजकारण तापलं आहे. 

भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी अकलूज येथे जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली.त्यांची नाराजी दूर करण्याचा आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटील आणि महाजन यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. गिरीश महाजन मुंबईकडे परतण्यासाठी निघाले, पण मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रंचड गोंधळ घातला. शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी आडवली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा घातला. निंबाळकरांना पाडा, तुतारी हातात घ्या,.. यासारख्या घोषणा दिल्या. अशातच विजयसिंह मोहिते पाटील पाटील पुन्हा घरवापसी करणार असा अशा चर्चा रंगू लागल्या. शरद पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांना उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चाही सुरु आहे. 

निंबाळकरांचं तिकिट कापलं जाणार ? महाजन काय म्हणाले ?

मोहिते पाटील यांची नाराजी, राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार  आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा  प्रयत्न केला. येथील सर्व काही मी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर सर्वकाही घालेन, त्यानंतर ते निर्णय घेतील. लोकसभासाठी आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे., मोहिते पाटलांची नाराजी, राग आपल्याला परवाडणारा नाही, असे म्हणत महाजन यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महाजन यांच्या वक्तव्यानंतर निंबाळकरांचं तिकिट कापलं जाणार का? या चर्चा माढ्यामध्ये सुरु आहे. 

कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप - 

मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आज तासभर चर्चा झाली. महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.  बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले.  गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेले. पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही. जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय  शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. 

माढ्यात कार्यकर्ते नाराज, भाजपला फटका बसणार का ?

जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय  शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. मोहिते पाटील यांची नाराजी , राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार  आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा  प्रयत्न केला. 

खासदार निंबाळकरांचे विरोधक एकवटले, तुतारी हातात घेणार का? 

माढा लोकसभा मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आज मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात फलटण , माण खटाव , करमाळा, माढा सांगोला परिसरातील मोहिते पाटील समर्थक जमा झाले होते. यात रामराजे निंबाळकर , संजीव बाबा निंबाळकर , आमदार दीपक चव्हाण , शेकाप चे आमदार भाई जयंत पाटील , करमाळा माजी आमदार नारायण पाटील असे नेते उपस्थित होते. दुपारी माढा लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. बैठक संपल्यावर मात्र कोणत्याही नेत्याने ही राजकीय बैठक नसून आम्ही फक्त स्नेहाभोजनसाठी आलो होतो अशी उत्तरे देत वेळ मारून नेली. आज झालेल्या घडामोडींवर शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून मोहिते पाटील याना तुतारी देवून उमेदवारी देण्याचा घडामोडींना वेग आला आहे. मूळचे पवारांचे विश्वासू सहकारी असलेले मोहिते-पाटील सध्या भाजपवासी असून सध्याच्या गणितानुसार, ते स्वगृही परतू शकतात, अशा चर्चांनी जोर धरलाय.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी