MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

राजू शेट्टी, धैर्यशिल माने अ‍ॅक्शन मोडवर



जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. अगदी अनपेक्षितपणे काँग्रेसचे एकहाती सत्ता मिळविली. आता वेध लागले आहेत ते 2024 च्या लोकसभेचे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात हॉट सिट म्हणून ओळखल्या जाणार्‍या हातकणंगले मतदार संघातही वातावरण तयार होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि विद्यमान खासदार धैर्यशिल माने सध्या अ‍ॅक्शन मोडवर आहेत. कोल्हापूर  आणि सांगली जिल्ह्यातील गावनगाव पिंजून काढण्यास दोघांनीही सुरूवात केली आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा पूर्वीचा इचलकरंजी मतदार संघ. या मतदार संघावर बाळासाहेब माने यांची निर्विवाद सत्ता होती. मतदार संघ पुनर्रचनेत हा मतदार संघ हातकणंगले मतदार संघ म्हणून ओळखला जावू लागला. या मतदार संघाला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि वाळवा हे दोन विधानसभा मतदार संघ जोडले गेल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकारण निदान लोकसभेपुरतेतर एकमेकावर अवलंबून राहू लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची वर्दळ शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघात वाढू लागली.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. राष्ट्रवादीने तत्कालिन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या निवेदिता माने यांना रिंगणात उतरविले. त्यांच्या विरोधात शेतकर्‍यांचे उगवते नेते शिरोळ मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी धक्कादायरित्या निवेदिता माने यांचा पराभव केला आणि एक मोठा इतिहास निर्माण केला. नवख्या असणार्‍या राज्ाू शेट्टी यांना सर्व समाजाने अगदी उचलून धरले आणि भरघोस मतांनी निवडून दिले. 

2014 च्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. भारतात मोदींचे वातावरण तयार होत होते. नरेंद्र मोदी ही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उदयास आले होते. राजू शेट्टी यांनी याचा फायदा घेतला आणि भाजपच्या वळचणीला गेले. याचा फायदा त्यांना झाला आणि त्यांनी काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा दारून पराभव केला. 

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी आणि भाजपचे बिनसले. राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादीच्या संगतीला गेले. काँग्रेसनेही ही जागा स्वाभिमानीच्या वाट्याला दिली. येथून राजू शेट्टी यांची उमेदवारी घोषित झाली. विरोधकांतर्फे शिवसेनेने या जागेवर युवा नेते धैर्यशिल मानेंना उमेदवारी दिली. राजू शेट्टी सहज निवडून येतील असे वाटत असतानाच धक्कादाय निकाल लागला आणि धैर्यशिल माने यांनी राजू शेट्टी यांना धूळ चारली. 

दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव केला. 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत शेट्टींचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांचा नेता म्हणून ओळख मिळवली. त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभा केली होती. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला. त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले. त्यामुळं एक मुरब्बी राजकारणी विरुद्ध तरुण तडफदार उमेदवार असं चित्र याठिकाणी पाहायला मिळालं. 

आता सर्वांना वेध लागले आहेत ते 2024 च्या निवडणुकीचे. दोघांनीही तयारी सुरू केली आहे. राजू शेट्टी यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात धावता दौरा सुरू झाला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गट यांना जवळ न करता एकला चलो रेे ची भूमिका त्यांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण एकट्यानेच लढायचे असे त्यांनी ठरविले आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचालही सुरू आहे. शेतकर्‍यांबरोबर त्यांनी आता उस वाहतूकदारांचीही मोठी मोट बांधली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उस वाहतूक दारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेवून ज्या त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी देण्यासाठी ते स्वता पुढे होत आहेत. उस वाहतूकदारांचा मोर्चा आणि मेळावे घेवून जनजागृती करीत आहेत. 

इकडे खासदार धैर्यशिल माने यांनी शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. कारण गेल्या निवडणुकीत याच दोन मतदार संघात त्यांना कमी मते पडली होती. आमदार मानसिंगराव नाईक आणि आमदार जयंत पाटील यांच्या मतदार संघात त्यांनी मते खेचून आणायची आहेत. धैर्यशिल माने सध्या शिंदे गटात जरी असले तरी येणार्‍या निवडणकीत ते भाजपच्या तिकीटावर लढतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक असो की आष्ट्यातील एम. आय. डी. सी असो धैर्यशिल माने यामध्ये जातीने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. विकासकामात धैर्यशिल माने जरी कमी पडले असले तरी आपला जनसंपर्क वाढविण्यास त्यांनी बाजी मारली आहे. 

महाविकास आघाडीने आपले पत्ते अजून खुले केले नाहीत. महाविकास आघाडी जर एकत्र लढली तर ही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही मागू शकतात. कारण धैर्यशिल माने हे शिवसेनेच्या कोट्यातून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीही येथे आपला हक्क सांगू शकते. 

एकंदरीत सध्या राज्ाू शेट्टी आणि धैर्यशिल माने या दोघांनीही जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. येणार्‍या काळात कोण कोणाबरोबर जातील हे सांगता येत नसले तरी ऐनवेळी गडबड नको म्हणून दोघेही सध्या जनसंपर्क वाढविला आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी