MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

..नवीन लोकसभा, तर महाराष्ट्रातून 82 खासदार होतील




 नवीन संसदेचे रविवारी उद्घाटन झाले. यापूर्वी जुन्या लोकसभेत खासदारांना बसण्यासाठी जागेची मर्यादा होती. यामुळे लोकसंख्येनुसार नवीन सीमांकन झाले नव्हते. आता नवीन इमारतीत जास्त जागा करण्यात आल्या आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याचे म्हटले आहे. 

यामुळे पुन्हा नव्याने सीमांकनाची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन 

सीमांकनाबाबत उल्लेख केला. यापूर्वी 1976 सीमांकन झाले होते. त्यानुसार लोकसभेच्या 543 जागा आहे. आता 2026 मध्ये सीमांकन होण्याची शक्यता आहे.

काय होणार बदल

गेल्या 52 वर्षांपासून लोकसंख्येच्या आधारे सीमांकन झालेले नाही. सध्याच्या लोकसभेच्या 543 जागा 1971 च्या जनगणनेच्या आधारावर आहे. 1971 च्या जनगणनेला आधार मानून शेवटचे परिसीमन 1976 मध्ये केले गेले. त्यावेळी देशाची लोकसंख्या 54 कोटी होती. त्यानंतर देशात शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. 2021 ची जनगणना अजून व्हायची आहे. परंतु आता देशाची लोकसंख्या 142 कोटी झाल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात 82 जागा

1971 मध्ये प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे लोकसभेची एक जागा असा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी 543 लोकसभेच्या जागा निश्चित झाल्या. 2011 मध्ये देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. परंतु 2026 मध्ये समान जनगणनेचा आधार घेत परिसीमन केले आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक जागा हे सूत्र स्वीकारले तर देशभरात एकूण 1210 जागा असतील. परंतु नवीन संसदेच्या लोकसभेत जास्तीत जास्त 888 खासदारच बसू शकतील. परिसीमनाच्या आधारे 1210 जागांसह हे समायोजित केले तर यूपीला 147 जागा मिळतील आणि 

महाराष्ट्राला 82 जागा मिळतील. हाच फॉर्म्युला इतर राज्यांमध्येही लागू होईल.

सीमांकनानंतर दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये 42% जागा वाढतील. तर आठ हिंदी भाषिक राज्यांतील जागा सुमारे 84 टक्क्यांनी वाढतील. म्हणजेच दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत दुप्पट जागा. गेल्या निवडणुकीत या आठ राज्यांतून भाजपला 60 टक्के जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच नवीन सीमांकन भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कधी कधी झाले सीमांकन

देशात पहिले सीमांकन 1951 च्या जनगणेनुसार 1952 मध्ये झाले होते. त्यावेळी लोकसभा खासदारांची संख्या 494 ठरवण्यात आली. दुसरे सीमांकन 1961 च्या जणगणनेनुसार 1963 मध्ये झाले. त्यावेळी खासदारांची संख्या वाढून 522 वर गेली तिसरे सीमांकन 1971 च्या जणगणेनुसार 1973 मध्ये झाले. त्यावेळी खासदारांची संख्या 543 झाली. त्यानंतर 2002 मध्ये सीमांकन झाले. मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. आता 2026 मध्ये सीमांकन होणार आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी