पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट;

इमेज
 युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट;  बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर कोलकत्ता : देशभरातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावं आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार नुसरत जहा यांना मात्र पक्षाकडून आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच, दिग्गज क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर, बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीनं महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.  नुसरत जहाँ यांचा पत्ता कट, तर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा रिंगणात  तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये

कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु!

इमेज
 कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु!   शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांचा पत्ता कट होणार? कोल्हापूर एबीपी माझा :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  महायुतीमध्ये जागा वाटपावरून नाराजीचा सूर सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तोच खेळ सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी होणार की नाही? ही चर्चा एका बाजूने असतानाच दुसर्‍या बाजूला महायुतीमध्ये शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा मिळणार तरी किती? याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, जागा मिळाल्या तरी त्या कोणत्या असणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात येत असली तरी अजूनही सन्मानजनक तोडगा निघालेला नाही. जागावाटपावरून अजित पवार गट आणि शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. जागाच देणार नसतील, तर चर्चा तरी कशाला? असाच सूर दोन्ही गटात आहे.  भाजपकडून एकेरी जागा वाटणीला येणार असल्याची चर्चा असल्याने सुद्धा नाराजीत भर पडली आहे. दुसरीकडे, पक्ष तुमचा चिन्ह आमचे असाही प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याने दोन्ही गटातील नेत्यांची नाराजी आणखी वाढली आहे. महायुती

शिंदेंना 10-12, अजितदादांना 3-4 जागा, अमित शाहांचं गणित मतदारांना पटणार का?

इमेज
 शिंदेंना 10-12, अजितदादांना 3-4 जागा, अमित शाहांचं गणित मतदारांना पटणार का?  मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरून महायुतीतील तिढा अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यासाठी दिल्ली गाठावी लागली. अमित शाह यांच्यासोबत अनेक तास बैठका होऊनही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुतीचं घोडं नेमक अडलंय कुठे? भाजपचा शिंदेंच्या कोणत्या जागांवर दावा आहे? अजित पवारांना किती जागा मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं ही जागावाटपानंतर मिळणार आहेत. चार पॉवरफुल्ल नेत्यांना तिढा सोडवणं अवघड रात्री साडे दहा ते पहाटे एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील तीन बलाढ्य नेते आणि देशातील क्रमांक दोनचे शक्तिशाली समजले जाणारे अमित शाह यांनी बैठक घेतली. पण अशा पॉवरफुल मंडळींना एक प्रश्न सोडवणं सध्या अवघड झालाय आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असे सगळेजण शुक

बारामतीमध्ये शरद पवारांनी पहिला डाव टाकला

इमेज
 बारामतीमध्ये शरद पवारांनी पहिला डाव टाकला ,  एका भेटीत 40 वर्षांचा संघर्ष संपवला पुणे : बारामती लोकसभेसाठी दोन्ही पवार गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. अजित पवारांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत होतं, पण आता शरद पवारांनी आपला पहिला डाव टाकलाय. शरद पवारांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांच्या भोरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. थोपटे यांच्यासोबतचा गेल्या 40 वर्षांपासून असलेला संघर्ष मिटवण्यासाठी भोरमध्ये जाणीवपूर्वक पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं.  बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात आज सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पुढाकारातून या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.  चाळीस वर्षांच्या संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न  भोरमधील सभेआधी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

इमेज
 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर राहुल गांधी ‘या’ जागेवरून निवडणूक लढवणार! आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसनेही आज (8 मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण 39 उमेदवारांची नावे असून यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण 39 नेत्यांचा समावेश आहेत. याच पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. राहुल गांधींना काँग्रेसने वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 2019 साली त्यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र ते पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातून

समडोळीत 9 मार्च रोजी महामस्तकाभिषेक सोहळा

इमेज
 समडोळीत 9 मार्च रोजी महामस्तकाभिषेक सोहळा समडोळी  येथील जुने समडोळी येथील श्री 1008 भगवान आदीनाथ जिनमंदिर येथे शनिवार 9 मार्च रोजी भव्य महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष रवी खोत आणि इतर सदस्यांनी दिली.  यावेळी खोत म्हणाले, अतिशय क्षेत्र आदिगिरी येथे श्री 1008 भगवान आदिनाथ मोक्ष कल्याणक दिनानिमित्त शनिवार 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बहनमूर्तीचा महामस्तकाभिषेक होणार आहे.  यानिमित्त सकाळी 6 वाजता मंगलनिनाद, 8 वाजता ध्वजारोहण, दुपारी 3 वाजता महामस्तकाभिषेक, संध्याकाळी 6 वाजता संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी शतक महोत्सवी शतक दीपोत्सव 501 दानराशी होणार आहे. प्रति अभिषेक दानराशी 10 हजार रूपये आहे. यावेळी जलाभिषेक, नालिकाराभिषेक, इक्षुरसाभिषेक, धृताभिषेक, दुग्धाभिषेक, दग्धाभिषेक, सर्वोषधीभिषेक, कल्कचुर्णाभिषेक, कषायचूर्णाभिषेक, चतुषकोणाभिषेक, हल्दीभिषेक, चंदनाभिषेक, पुष्पवृष्टी, दीपावतरण, मध्यकलशाभिषेक, मंगलआरती आदी अभिषेक होणार आहेत.  सकाळी आठ वाजता सौ. व श्री.  नेमिनाथ आप्पासो पाटील केसुरे यांच्याहस्ते ध्वजारोहण होेणार आहे. सर्व श्रा

शिंदेंसोबत आलेल्या 13 खासदारांचं काय होणार? शिवसेनेला केवळ आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता!

इमेज
 शिंदेंसोबत आलेल्या 13 खासदारांचं काय होणार? शिवसेनेला केवळ आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता! मुंबई : राज्यातील महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेवर दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं होत असून ती अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय. त्यामध्ये भाजपकडून राज्यात 32 जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसतंय. अजित पवार गटासोबत दोन खासदार असल्याने त्यांचं जास्त काही नुकसान होणार नाही, पण शिंदे गटाचं काय असा प्रश्न विचारला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंना सोडून आलेल्या 13 खासदार असून त्यांच्यातील काही जणांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही असं बोललं जातंय. दिल्लीत भाजपची जागावाटपावर चर्चा राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये फक्त भाजप नेत्यांचा समावेश आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते, त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकना

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी