MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट;



 युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट;

 बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर

कोलकत्ता : देशभरातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावं आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार नुसरत जहा यांना मात्र पक्षाकडून आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच, दिग्गज क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर, बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीनं महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 

नुसरत जहाँ यांचा पत्ता कट, तर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा रिंगणात 

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्यानं निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं होतं. तसेच, अखिलेश यादव यांच्याशी यूपीतील एका जागेवर निवडणूक लढवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

क्रिकेटर युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात 

तृणमूल काँग्रेसनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. टीएमसीनं बहरामपूरमधून युसूफ पठाण यांना तिकीट दिलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात लढतील. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील बहरामपूरमधील निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. महत्त्वाची बाब म्हणजे, तृणमूलनं ज्या मतदारसंघासाठी क्रिकेटर युसूफ पठाण यांचं नाव जाहीर केलं असलं तरी, अद्याप काँग्रेसनं मात्र त्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, हे अद्याप जाहीर केलेलं नाही. पण, काँग्रेसकडून बहरामपूरची जागा अधीर रंजन चौधरीच लढणार असल्याच्या चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी