MY POSTS
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर
राहुल गांधी ‘या’ जागेवरून निवडणूक लढवणार!
आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसनेही आज (8 मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण 39 उमेदवारांची नावे असून यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण 39 नेत्यांचा समावेश आहेत. याच पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. राहुल गांधींना काँग्रेसने वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 2019 साली त्यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र ते पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसर्यांदा याच मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे आहेत. वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयातील व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत. काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.
काँग्रेसच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश नाही!
दरम्यान, भाजपकडूनही पहिली यादी 195 उमेदवारांची घोषित करण्यात आली असली, तरी महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाची घोषणा झालेली नाही. यावरून महायुतीमध्ये असलेल्या जागावाटपावरून सुरु असलेल्या घडामोडींचा अंदाज येतो. दुसरीकडे, काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही एकमत झालेलं नाही. वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा अजूनही निकालात निघालेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान देण्यात आलेल नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा