MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु!



 कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु!  

शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांचा पत्ता कट होणार?

कोल्हापूर एबीपी माझा : 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  महायुतीमध्ये जागा वाटपावरून नाराजीचा सूर सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तोच खेळ सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी होणार की नाही? ही चर्चा एका बाजूने असतानाच दुसर्‍या बाजूला महायुतीमध्ये शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा मिळणार तरी किती? याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, जागा मिळाल्या तरी त्या कोणत्या असणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात येत असली तरी अजूनही सन्मानजनक तोडगा निघालेला नाही. जागावाटपावरून अजित पवार गट आणि शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. जागाच देणार नसतील, तर चर्चा तरी कशाला? असाच सूर दोन्ही गटात आहे. 

भाजपकडून एकेरी जागा वाटणीला येणार असल्याची चर्चा असल्याने सुद्धा नाराजीत भर पडली आहे. दुसरीकडे, पक्ष तुमचा चिन्ह आमचे असाही प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याने दोन्ही गटातील नेत्यांची नाराजी आणखी वाढली आहे. महायुतीमध्ये येताना दिलेला शब्द पाळावा, अशी आर्जव दोन्ही गटाकडून करण्यात येत असली, तरी भाजप जिंकेल त्यालाच संधी अशा तत्वाने फारशा जागा देण्यास  तयार नाही.  

संजय मंडलिक यांचा कोल्हापुरातून पत्ता कट होणार का?

मात्र, ज्या जागांवर शिंदे गटाचा दावा आहे त्या जागांवर भाजपकडूनही दावा करण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापुरातील दोन्ही जागांचा समावेश आहे. कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा या ठिकाणी विद्यमान दोन्ही खासदार हे शिंदे गटातील असले, तरी या दोन्ही उमेदवारांविरोधात असलेली नाराजी त्यांना भोवण्याची शक्यता आहे का? अशी चर्चा आहे. या दोन्ही जागांवर भाजपकडून थेट दावा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी संजय मंडलिक हेच उमेदवार असतील, असे सातत्याने येत सांगण्यात येत असलं तरी पडद्यामागून भाजपकडून सुत्र हलवली जात आहेत. भाजप आणि महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये दोन्ही मतदारसंघात विरोधी वातावरण असल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.

कोल्हापूरसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचे नावे निश्चित करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून नाव समोर आलं आहे. कोल्हापूर भाजप ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना तयारीत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने पर्यायी मार्गांचा विचार सुरु केला आहे.  

महाविकास आघाडीकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर भाजपसह महायुती विचारात पडली आहे. शाहू महाराजांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा असेल, तर तो कोण असावा? याची चर्चा भाजपकडून सुरू आहे. समरजीत घाटगे यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यांनी बोलण्यास नकार देताना पक्षशिस्त असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांचा कोल्हापुरातून पत्ता कट होणार का? अशी चर्चा आता रंगली आहे. 

भाजपकडून कोल्हापूर आणि हातकणंगले पिंजून काढण्यात येत असताना शिवसेना शिंदे गटानं सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केलं आहे. शिंदे गटाचे अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं. मुख्यमंत्र्यांचे सुद्धा दौर्‍यावरती दौरे सुरू आहेत. एक दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा पार पडला. मात्र, असे असूनही कोल्हापूरची जागा शिंदे गटाला मिळणार की नाही? याची चर्चा आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही नाराजी

दुसरीकडे, कोल्हापूर लोकसभेप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही धैर्यशील माने यांच्या विरोधात नाराजी आहे. मतदारसंघामध्ये गायब असल्याचा सातत्याने होत असलेला आरोप, आवाडे गटाकडून त्यांना असलेला विरोध आदी कारणे आहेत. महाविकास आघाडीकडून हातकणंगलेत कोणताही उमेदवार न देता राजू शेट्टी यांना मार्ग प्रशस्त करून देण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अजून निश्चित निर्णय झाला नसला. तरी जागा ठाकरे गटाला जागी सुटल्यास ठाकरे गट याठिकाणी उमेदवार न देता राजू शेट्टी यांना बळ देण्याची शक्यता आहे. 

याठिकाणी राजू शेट्टी विरुद्ध माने हे चित्र सध्याला दिसत असलं तरी या ठिकाणी सुद्धा भाजपने दावा केला आहे. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या महायुतीच्या जागावाटपात भाजपने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला या दोन्ही जागा राखण्यात यश येणार की नाही? याची चर्चा आहे. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले. कोल्हापूरमधील एकमेव सेना खासदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे शिंदे गटाला जाऊन मिळाले. दोन माजी आमदारांनी सुद्धा शिंदे गटाला साथ दिली. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही खासदारांना आता आपलं स्थान गमवावं लागणार का? अशी चर्चा आहे. असे न झाल्यास ऐनवेळी भाजपच्या चिन्हावर उतरणावर का? अशीही शक्यता नाकारता येत नाही. 

विनय कोरे हातकणंगलेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून आमदार विनय कोरे यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे आमदार असले तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही विनय कोरे हे भाजपसोबत होते. त्यामुळे विनय कोरे हातकणंगलेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का? याकडे आता लक्ष असेल. विनय कोरे यांचं वारणा खोर्‍यामध्ये असलेले प्राबल्य, त्याचबरोबर महाडिकांची असणारी साथ या सर्व बाबींचा विचार केला तर ते सुद्धा सक्षम उमेदवार होऊ शकतात.  कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरमध्ये आपला उमेदवार विजयी होण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार कोल्हापूरमध्ये भाजपचा निवडून येऊ शकला नव्हता. चंद्रकांत पाटील हे जरी आमदार असले तरी ते कोथरूडमधून आमदार आहेत. त्यामुळे लोकनियुक्त एकही आमदार किंवा खासदार कोल्हापूरतून नसल्याने भाजप सध्या कोल्हापूरमध्ये बॅकफूटवर आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी