MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

समडोळीत 9 मार्च रोजी महामस्तकाभिषेक सोहळा


 समडोळीत 9 मार्च रोजी महामस्तकाभिषेक सोहळा

समडोळी 

येथील जुने समडोळी येथील श्री 1008 भगवान आदीनाथ जिनमंदिर येथे शनिवार 9 मार्च रोजी भव्य महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष रवी खोत आणि इतर सदस्यांनी दिली. 

यावेळी खोत म्हणाले, अतिशय क्षेत्र आदिगिरी येथे श्री 1008 भगवान आदिनाथ मोक्ष कल्याणक दिनानिमित्त शनिवार 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बहनमूर्तीचा महामस्तकाभिषेक होणार आहे. 

यानिमित्त सकाळी 6 वाजता मंगलनिनाद, 8 वाजता ध्वजारोहण, दुपारी 3 वाजता महामस्तकाभिषेक, संध्याकाळी 6 वाजता संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी शतक महोत्सवी शतक दीपोत्सव 501 दानराशी होणार आहे. प्रति अभिषेक दानराशी 10 हजार रूपये आहे. यावेळी जलाभिषेक, नालिकाराभिषेक, इक्षुरसाभिषेक, धृताभिषेक, दुग्धाभिषेक, दग्धाभिषेक, सर्वोषधीभिषेक, कल्कचुर्णाभिषेक, कषायचूर्णाभिषेक, चतुषकोणाभिषेक, हल्दीभिषेक, चंदनाभिषेक, पुष्पवृष्टी, दीपावतरण, मध्यकलशाभिषेक, मंगलआरती आदी अभिषेक होणार आहेत. 

सकाळी आठ वाजता सौ. व श्री.  नेमिनाथ आप्पासो पाटील केसुरे यांच्याहस्ते ध्वजारोहण होेणार आहे. सर्व श्रावक श्राविकांच्या जेवणाची आणि वाहतुकीची सोय केलेली आहे, तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसेच रविवार 10 रोजी अमावस्या पूजा होणार आहे. या पुजेचे यजमान   सौ. व श्र्री इंद्रजित भूपाळ गळतगे रा. कसबे डिग्रज हे आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी