SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांसाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांची महाविकास आघाडीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच त्यांची आणि श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेऊन याबाबत निर्णय होईल, असे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्याने महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी गोंधळ आहे का या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत अजून महायुतीने पत्ते खोलले नाहीत. कोणते पक्ष किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट नाही. किमान महाविकास आघाडीच्या बैठका तरी झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी 10 तारखेचा मुहूर्त ठरला आहे. जागा वाटप झाल्यानंतरच दिशा स्पष्ट होणार यामुळे महाविकास आघाडीत काही अडचण असणार नाही.
कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दावा आहे, हा दावा स्वाभाविक आहे. मात्र कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वरिष्ठना कळवले आहे. आता कोल्हापूरची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार यावर ती जागा ठरेल. काँग्रेस पक्षांकडे जागा आली तर चांगलाच उमेदवार दिला जाईल. कोल्हापुरात काँग्रेसला चांगलं वातावरण असल्याने आमच्याकडे जागा राहावी यासाठी आग्रही असल्याचे आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले.
राज्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचेच नियंत्रण नाही, आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत असेल तर सामान्य माणसाने आशेने कोणाकडे बघायचं? राज्यात नेहमी कायदा व सुव्यवस्था चागंली राहिली मात्र ही परिस्थिती सत्ताधारी बिघडवण्याचं काम करत आहेत, तीन पक्षाचं सरकार असल्याने कोण सरकार चालवत कळतं नाही,
अधिकार्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही, पूर्णपणे राज्याची परिस्थिती ढासळली आहे. मुख्यमंत्र्याची गुंडगिरी आहे असे आमदार म्हणत असेल तर याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी करणे गरजेचे आहे हा वाद लोकांच्या हितासाठी झाला का? एखाद्या जागेसाठी झाला याचा खुलासा झाला पाहिजे, सरकार टीकवण्यासाठी तुम्ही काहीही करा अशी मुभा दिली आहे का? असा सवाल ही माजी गृहमंत्री आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा