MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

कुंजीवनमध्ये बालकांवर मौजीबंधन संस्कार

उदगाव कुंजवन येथे महोत्सवात मौजीबंधन संस्कार करताना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज समोर उपस्थित बालके

 उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवन महोत्सवात दोनशेहून अधिक बालकांवर मौजीबंधन संस्कार करण्यात आले. आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज यांनी मुलांवर स्वतः संस्कार करत त्यांना व्रत व उपदेश दिला. यावेळी यागमंडल विधान, गुरूकृपा व्रतसंस्कार महोत्सव हजारो भक्तांच्या व मुनीश्रींच्या ससंघाच्या उपस्थितीत संपन्न झाला. 




 गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात आले. 
सकाळी जाप्य, अभिषेक, शांतीधारा, नित्य पूजा याचबरोबर सौभाग्यवती महिला व कुमारिका यांच्याद्वारे गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात आले. ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते झाले. मौजीबंधन संस्कार विधी मुख्य सभा मंडपात अंतर्मना आचार्य श्रींच्या सानिध्यात व मंत्रोच्चाराने झाला. यावेळी जैन धर्माच्या परंपरेनुसार जीवनाची वाटचाल कशी करावी. कोण कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, व्यसनापासून दूर राहावे, शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ आहार, आई-वडिलांची सेवा, समाजाप्रति असलेली जाणीव असा धर्मोपदेश आचार्य श्री यांनी उपस्थित बालकांना दिला. मंगलाष्टके म्हणून अक्षतारोपन करण्यात आले. 

महायागमंडल विधान आचार्यश्रींच्या सानिध्यात संपन्न झाला. 
दुपारी नवग्रहशांती, हवनास प्रारंभ झाला. त्यानंतर महामंडल आराधना, सायंकाळी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्नसागर महाराज यांचे प्रवचन, आनंद यात्रा तसेच मंगल आरती करण्यात आली. रात्री सौधर्म इंद्राची सभा, तत्वचर्या, सौधर्मइंद्रांचे आसन कंपायमान, धनपती कुबेरची आज्ञा, कुबेरद्वारा कोषांबी नगराची रचना तसेच रत्नवृष्टी इत्यादी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाराज धारणजी द्वारे याचिकांची आशापूर्ती, कुबेरद्वारे अष्टकुमारीकांची सुषमादेवी मातांच्या सेवेमध्ये नियुक्ती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.





श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित
याप्रसंगी आकाश जैन, मनीष जैन, प्रदीप जैन, नितेश पाटनी, सनी कासलीवाल, शैलेश पहाड़िया, दर्पण जैन, निमेष जैन तसेच श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर कमिटी, सन्मति ग्रुप, महिला मंडल यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी