MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सांगलीत अक्षता कलशाचे पूजन; शहरातून शोभायात्रा




जनप्रवास ।  सांगली: 

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या जानेवारीत होणार्‍या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रविवारी सांगलीत मंगल अक्षता कलशाचे पूजन करून रथातून शोभा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सजवलेल्या रथात मंगल कलश ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहर राममय झाले होते. कोटणीस महाराज, केळकर महाराज, गोडसे महाराज आदींसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


हेही आवर्जुन वाचा

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न...

(loksabha ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी?

(sangli )काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप जोमात

 

अयोध्येतील श्री राम मंदिराचे दि. 22 जानेवारीला होणार आहे.

 त्या सोहळ्यानिमित्त देशभरात मंगल अक्षता कलश यात्रा काढण्यात येत आहे. रविवारी सांगलीत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मारुती चौकात मुख्य कलशासह 21 कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या रथात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेसमोर मंगल अक्षता कलश ठेवण्यात आला. यात्रेत मोठ्या संख्येने राम भक्त भगव्या टोप्या घालून करून तर महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. 




मार्गावर लक्षवेधक रांगोळ्या 

मारुती चौकातून बालाजी चौक तेथून एक नंबर शाळेसमोरून महापालिकेसमोर आणि तेथून खणभागात पंचमुखी मारुती रस्त्यावरून ही यात्रा मार्गस्थ झाली. यात्रा मार्गावर लक्षवेधक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते. शहरात विविध ठिकाणी महिलांनी औक्षण करून कलशाचे पूजन केले. फटाके उडवून यात्रेचे स्वागत करण्यात येत होते.राम मंदिर येथे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यात्रेत भाग घेतला. मंगल अक्षता कलश राम मंदिरात नेऊन तेथे आरती करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री खाडे यांनी कलश पुन्हा रथात ठेवला. येथून वेलणकर मंगल कार्यालयात यात्रा गेली. तेथे कलश ठेवण्यात आले. 




महिलांची संख्या देखील जास्त  

यात्रेत यात्रेत खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, उद्योजक मनोहर सारडा, हभप संजय कोटणीस, केळकर महाराज, श्रीकांत शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपच्या महिला आघाडीच्या पश्चिम विभागीय सरचिटणीस स्वाती शिंदे, माजी नगरसेवक युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.युवराज बावडेकर आदी उपस्थित होते. यात्रेत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महिलांची संख्या देखील जास्त होती. 





टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी