MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन




बावनकुळे यांचा माजी आ.जगताप यांना तब्बल 10 वेळा फोन

मात्र रिस्पॉन्स नाही, टेक्स मेसेज वर पण दिले नाही उत्तर, नाराज असल्याची चर्चा.


अमोल कुलकर्णी 

गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप  यांना भाजपकडून सातत्याने डावले जात असून, त्यातच उमदी येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या समोर आमदार गोपिचंद पडळकर यांनी कार्यक्रम हायजॅककेला असल्याची चर्चा असताना. त्यावरुन माजी आमदार विलासराव जगताप व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा होती. विधानसभेचे प्रचार प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी  मोदी नाईन हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, एकूण 65 गावात आतापर्यंत त्यांनी नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातून जत तालुका हा मोदी नाईन कार्यक्रमात आघाडीवर आहे . मोदी नाईन या कार्यक्रमास विलासराव जगताप यांनी मात्र पाठ फिरवली असून, शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रास्ता रोको करून एक प्रकारे शासनाला घरचा आहेर दिला होता.  यावरूनच माजी आमदार विलासराव जगताप हे भाजपवर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच खासदार संजयकाका पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात माजी आमदार विलासराव जगताप यांचा राजकीय संघर्ष सुरू असून. त्यातच उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात गळ घालण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवात केली असून. उपमुख्यमंत्री अजित पवार व  माजी आमदार विलासराव जगताप यांचे राजकीय सलोखा जग जाहीर आहे.

 दुष्काळी फोरमच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात अजितदादा गट मोठा करण्यात माजी आमदार विलासराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. सांगली जिल्ह्यातील दोन माजी आमदार यांना गळ घालण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवात केली असून. दोन्ही पैकी एका माजी आमदार याच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालणार असल्याची चर्चा आहे .त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळाला माजी आमदार विलासराव जगताप लागू नये यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांना तब्बल दहा फोन केले व टेक्स् मेसेज करून बोलणार आहे, असा मेसेज पाठवला. मात्र माजी आमदार विलास जगताप यांनी चंद्रकांत बावनकुळे यांना रिस्पॉन्स दिला नाही. माजी आमदार विलासराव जगताप काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. येणार्‍या काळात माजी आमदार विलासराव जगताप हे राजकीय भूकंप घडवून अजितदादा गटात सामील होतात का याकडे आता जिल्ह्याचे  लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी