MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सांगलीत भाजप सुसाट, काँग्रेसमध्ये मतभिन्नता



आ. सुधीर गाडगीळ यांची विकास कामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल 

अनिल कदम जनप्रवास 

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप सुसाट असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन मतभिन्नता असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी सांगली शहरासह ग्रामीण भागात कामांचा सपाटा लावला आहे. रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सांगली-पेठ रस्ता, कवलापूर विमानतळाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. जनसंपर्काच्या माध्यमातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे गाडगीळ विधानसभेतील मार्ग सुकर असल्याचे चित्र दिसून येते.

भाजपचे सांगली मतदारसंघातील आमदार गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे आठ वर्षापुर्वी कुणालाही वाटले नव्हते. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी होवून विधानसभेत प्रवेश केला. या कालावधीत केलेल्या कामांच्या जोरावर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग दुसर्‍यांचा आमदारकी मिळवली. गेल्या साडेआठ वर्षात आपल्या कामाने ते खर्‍या अर्थाने जनतेचे आमदार झाले. शहर आणि ग्रामीण भागात कामांची जंत्री खूप असते. मात्र अशी कामे, जी समाजाला पुढे दीर्घकाळ उपयोगी पडतात, अशी कामे करण्यात आ. गाडगीळ यांचा हातखंडा आहे. 

सांगलीतील विकसित विश्रामबागमधून रेल्वे मार्ग जातो. दक्षिण व उत्तर विश्रामबागला जोडणारा उड्डाणपूल पूर्ण केला. या कामामुळे आता विश्रामबागच्या उत्तर बाजूच्या नागरीकरणाला झपाट्याने गती मिळाली. सांगलीजवळच्या हरिपूरलगतच्या कृष्णा-वारणा संगमावरील हरीपूर-कोथळी पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे सांगलीची कनेक्टिव्हिटी आता आणखी वाढली आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्या चौकटीत काम करीत असते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून त्यांचे काम सुरु आहे. त्याच वेळी जिथे उणीव आहे, अडचणी आहेत तेथे मार्ग काढण्याची भूमिका ठेवली.

सांगलीत अप्पर तहसील कार्यालय सुरु होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरु होते, परंतु पहिल्या टर्ममध्ये आमदार गाडगीळ यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. जवळपास चाळीस वर्षांची सांगली अप्पर तहसिल कार्यालयाची मागणी पूर्ण झाली. या कार्यालयामुळे सांगलीसह पश्चिम भागातील अकरा गावांतील लोकांचे मिरजेला मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहेत. 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यापासून ऑक्सिजनसाठी रुग्णांना झगडावे लागले. अन्नदानाबरोबरच पंतप्रधान निधीस दोन लाख, मुख्यमंत्री निधीस एक लाख आणि भाजपच्या आपदा कोषास एक लाख रुपये दिले. याच काळात आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनाथाश्रमांना रोख मदत दिली. या काळात या संस्थांचे अर्थकारणच अडचणीत आले होते. त्यावेळी आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.   

सांगली-पेठ रस्त्यांचा प्रश्नही वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. या कामांसाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन या कामांसाठी साडेआठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सांगली बसस्थानक ते अंकली रस्त्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आमदार निधीतून रस्ते डांबरीकरण व गटर बांधकाम, सामाजिक सभागृह तसेच पथदिव्यांची कामे करण्यात आली. माजी सैनिकांच्या मागणीनुसार त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारण्यात आले. कोविड काळात सिव्हील हॉस्पिटल व महापालिका रुग्णालयास प्रत्येकी 17 लाखांची रुग्णवाहिका, सिव्हील हॉस्पिटलमध्ये 90 लाखांचा ऑक्सिजन प्लांट, 8.22 कोटी सिटी स्कॅन यंत्र आदी कामे करण्यात आली. सांगली शासकीय रुग्णालयाच्या खुल्या जागेत शंभर बेडच्या रुग्णालय उभारणीसाठी 45.40 कोटी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून शंभर बेडच्या रुग्णालयासाठी 32.45 कोटी मंजूर झाले आहेत. सिव्हील हॉस्पिटलच्या खुल्या जागेत मंजूर असलेले मिरज येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या नवजात शिशू रुग्णालय बांधकामास 46.74 कोटी मंजूर केले आहेत. 

दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. 2019 मध्ये निवडणूक लढविलेले पृथ्वीराज पाटील यांच्याकडून तयारी सुरु आहे. माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनीही सांगली विधानसभेसाठी दावेदारी सांगितली आहे. सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवेळी दादा गटाने यापुढील निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. दादा घराण्यामध्ये सुरु असलेला राजकीय संघर्षही संपला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीमध्ये संभ्रम कायम आहे. या परिस्थितीत सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप मात्र सुसाट असल्याचे चित्र आहे. आमदार गाडगीळ यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिककडे वाटचाल सुरु केली आहे. 

आमदार गाडगीळ पुलकरी 

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून नदी आणि रेल्वे ट्रॅकरील असे सहा पूल मंजूर केले, त्यापैकी काही पूर्ण झाले. त्यामुळे त्यांची गाडगीळ पूलकरी अशी प्रतिमा बनत चालली आहे. आयर्विन पुलाला समांतर पूल मंजूर केला. त्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा हरीपूर-कोथळी पुलाचे काम पूर्ण झाले. विश्रामबाग उड्डाण पूल, सह्याद्रीनगर पुलाचे काम पूर्ण झाले. तर माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर रेल्वे पूल आणि जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पुलासाठी निधी मंजूर केला आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार

राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा महायुतीचे सरकार आहे. पवार गटाच्या पाठींब्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी लवकरच आणखी विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये सांगलीतून सलग दोनवेळा विधानसभेत प्रवेश केलेले आ. सुधीर गाडगीळ यांना संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष आहे. 


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी