MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

राज्याच्या स्थापनेपासून जत, आटपाडीत मंत्रीपदाचाही दुष्काळ



 दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास 

 राज्याच्या राजकारणात गेल्या आठवड्यात मोठा भूकंप झाला आणि एका रात्रीतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले. मंत्रीपद मिळणे हा नशिबाचा आणि कर्तृत्वाचा भाग असला तरी सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्याला मात्र पाण्याच्या दुष्काळाबरोबर मंत्रीपदाचा दुष्काळही जाणवत आहे. कारण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून गेल्या 64 वर्षामध्ये अजून जत आणि आटपाडी तालुक्याला मंत्रीपदच मिळाले नाही. मंत्रीपदाचा हा दुष्काळ अनिल बाबर किंवा गोपिचंद पडळकर यांच्या रूपाने संपतो की काय हे येणार्‍या मंत्रीमंडळाच्या विस्तारातच समजेल.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1961 रोजी रोजी.  यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळाला. त्या अगोदर सांगली जिल्ह्याचा मुंबई प्रांतात समावेश होता. मुंबई प्रांताची निवडणूक मात्र 1952 पासून होत होती. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत विटा, खानापूर, आटपाडी मध्ये दोन जागा होत्या. या दोन्ही जागेवर लक्ष्मण भिंगारदेवे आणि दत्ताजीराव देशमुख निवडून आले. त्याचवेळी जतमधून विजयसिंहराजे डफळे अपक्ष म्हणून निवडून आले. 

त्यानंतर पाच वर्षानी झालेल्या 1957 च्या निवडणुकीत खानापूर आटपाडीमधून भगवान मोरे आणि पिराजीराव म्हडाले हे आमदार झाले तर जतमधून पुन्हा एकदा डफळे सरकारांना संधी मिळाली. 1962 मध्ये राज्याची निर्मिती झाली होती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत खानापूर आटपाडीमधून वसंतदादांचे कट्टर समर्थक संपतराव माने आणि भगवानराव पवार यांनी बाजी मारली. संपतनानांचा कार्यकाल याच निवडणुकीपासून सुरू झाला. जतमधून तुकाराम शेंडगे निवडून आले. 

1967 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी संपतनानांवर विश्वास ठेवला. त्यांच्या जोडीला  बी. एस. कोरे निवडून आले. जत मतदार संघ राखीव झाला होता. येथून एस. टी. बामने यांना संधी मिळाली. 1972 च्या निवडणुकीत  संपतनानांची हॅट्रीक झाली. त्यांच्या बरोबर उध्दव इंग्रे हे विधानसभेत गेले. जतमध्ये पुन्हा एकदा एस. टी. बामनेेंंना संधी मिळाली. 

1978 मध्ये खानापूर आटपाडीमधून शहाजी साळुंखेंनी बाजी मारली. तर जतमधून जयंत सोहनी हे नवखे उमेदवार निवडून आले. ही विधानसभा दोनच वर्षात बरखास्त झाली आणि पुन्हा एकदा 1980 मध्ये निवडणुका लागल्या. यावेळी मात्र गतवेळचा पराभव पुसून टाकत विट्याच्या हणमंतराव पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली. जतमध्ये पुन्हा एकदा जयंत सोहनी यांना संधी मिळाली. पाच वर्षानंतर 1985 मध्ये संपतनानांची पुन्हा एकदा विधानसभेत एंन्ट्री झाली. जतमध्ये माजी सैनिक असलेल्या उमाजीराव सनमडीकरांनी विजय खेचला. त्यानंतर उमाजीराव 1990 आणि 99 साली पुन्हा निवडून आले. 

1990 पासून सध्याचे विद्यमान आमदार आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले अनिल बाबर यांचा राजकारणात प्रवेश झाला. जतमधून पुन्हा एकदा उमाजीराव सनमडीकर निवडून आले. 1995 मध्ये भाजप सेनेने सर्वत्र धुमाकूळ घातला आणि ही युती सत्तेपर्यंत पोहोचली. सांगली जिल्ह्यातील पाच आमदार अपक्ष निवडून आले आणि त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला. यावेळी खानापूर आटपाडीमधून राजेंद्रअण्णा देशमुख निवडून आले परंतु त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. जतमधूनही विलासराव जगताप यांनी नवख्या असणार्‍या  मधूकर कांबळे यांना रिंगणात उतरवून उमाजीरावांना धूळ चारली. 

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले. यावेळी अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. जतमध्ये उमाजीरावांनी बाजी पलटवली आणि विधानसभेत प्रवेश केला. 

2004 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांना सर्व पक्षीयांना घेरले आणि विट्याच्या सदाशिवराव पाटील यांच्या पदरात माप टाकले. सदाशिवराव आमदार झाले. जतमध्ये विलासरावांनी सुरेश खाडे यांचे हुकमी पान काढून खाडेंना पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश मिळवून दिला. 2009 च्या विधानसधा निवडणुकीत खानापूर आटपाडमधून पुन्हा एकदा सदाभाउंनी दिमाखात विजय मिळविला. जत मतदार संघ खुला झाल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु केवळ 15 दिवसात येथे भाजपचे प्रकाश शेेंडगे आमदार झाले. 

2014 आणि गतवेळच्या 2019 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी विरोधकांना धूळ चारत विधानसभेत चौथ्यांदा प्रवेश केला. जतमधून विलासराव जगताप आणि गेल्या निवडणुकीत विक्रम सावंत विधानसभेत गेले.

आजपयंर्ंत खानापूर आटपाडीमधून 13 जणांनी विधानसभेत प्रवेश केला तर जतमधून 10 जणांनी विधानसभेची पायरी चढली आहे. गेल्या 64 वर्षात सर्व पक्षांचे सरकार सत्तेवर येउन गेले. असा कोणताच पक्ष राहिला नाही की जो सत्तेत आला नाही. परंतु खानापूर, आटपाडी आणि जतमधील कोणालाच मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. संपतराव माने आणि अनिल बाबर यांनी तर चारवेळा विधानसभा गाजवली परंतु तेही मंत्रीपदापासून दूरच राहिले. संपतराव मानेंच्या डोक्यावर तर दादांचा हात होता. परंतु तेही वंचितच राहिले. 

सध्या राज्यात शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता आहे. अनिल बाबर हे शिंदे गटाचे तर विधानपरिषदेवरील आमदार गोपिचंद पडळकर हे भाजपचे आहेत. अनिल बाबर यांचे शिंदेंशी आणि पडळकर यांचे देवेंद्र पडळकर यांच्यांची चांगले संबंध आहेत. परंतु अजूनही त्यांना संधी मिळाली नाही. येणार्‍या मंत्रीमंडळा जर यांना संधी मिळाली तर खानापूर, आटपाडीमधील मंत्रीपदाचा दुष्काळ संपनार आहे. जतमध्ये विक्रम सावंत आमदार आहेत परंतु सध्या तरी त्यांना संधी नाही.

उमाजीरावांना लाल दिव्याची गाडी 

खानापूर, आटपाडी मंत्रीपद जरी मिळाले नसले तरी जतच्या उमाजीराव सनमडीकरांना मात्र लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची संधी मिळाली आहे. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली होती. हे पद राज्यमंत्र्याच्या दर्जाचे असल्याने लाल दिव्याची गाडी मिळाली होती.


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी