MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

पृथ्वीराज देशमुखांची दावेदारी प्रबळ






अमृत चौगुले

भाजपच्या सांगली लोकसभा उमेदवारीद्वारे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी हॅटट्रिकचा इरादा केला आहे. परंतु भाजपअंतर्गत नाराजी आणि त्यांना स्थानिक पातळीवर पुन्हा विरोध सुरूच आहे. दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून दर्जेदार परफॉर्मन्सद्वारे त्यांनी तशी फिल्डिंगही लावली आहे. आता अध्यक्षपदाचा खांदेपालट करीत निशिकांत भोसले-पाटील यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे हा खांदेपालट आता देशमुखांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्हे तर ते दावेदारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचाही पक्षांतर्गत सूर आहे. 

उधार-उसनवारीवर जिल्ह्यात भाजपचे कमळ महायुतीच्या काळापासून फुलत होते. मात्र जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे 2014 पासून जिल्ह्यात भाजपची लाटच आली. या लाटेत सर्वाधिक आमदार झालेच, भाजपचा लोकसभेचा बुरुजही संजय पाटील यांच्यारूपाने काबिज झाला. पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप नंबर वनचा पक्ष बनून पाळेमुळे खोल रुजली गेली. अर्थात 2019 मध्ये त्यात प्रमाण कमी-जास्त झाले तरी लोकसभा निवडणुकीत  संजय पाटील यांनी  बाजी मारली होती. 

यामध्ये भाजपच्या मजबूत बांधणीत शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सुधीर गाडगीळ यांनी, तर ग्रामीणच्या बांधणीत विशेषत: पृथ्वीराज देशमुख यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यावर भाजपचा वरचष्मा ठेवण्यापासून ते गावनिहाय शाखा, बूथ बांधणी असो वा केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पोहोचविण्याचे काम त्यांनी मजबूत केले. दुसरीकडे खासदार संजय पाटील यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेला चालना देण्याचे आणि विविध विकासकामांना गती दिली. तरी पक्षांतर्गत एकसंधपणात त्यांचा काही मेळ जमला नाही. उलट त्यांच्या पक्षपेक्षा बाहेरच्यांना गोंजारून ‘सबका साथ, सबका विकास’ हा नाराजी वाढविणारा ठरला. यात 2014 पासूनच तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले तरी अजितराव घोरपडेंचा पराभव हा त्यांच्यातील मतभेदाची दरी वाढविणारा ठरला. विलासराव जगताप यांचाही पराभव आणि अन्य कारणे संजय पाटील यांच्याबद्दल नाराजी वाढविणारी ठरली आहेत. महायुतीत असूनही सहयोगी शिवसेनेचे खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्यातील अंतर्गत संघर्ष हा नेहमीच संजय पाटील यांच्याबद्दल नकारात्मक राहिला आहे. 

सोबतच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वादाची ठिणगी ही पृथ्वीराज देशमुख व संजय पाटील यांच्यात धगधगती राहिली आहे. त्यातून कुरघोड्यांचे राजकारण नेहमीच वरदेखले नसले तरी अंतर्गत वितुष्टत्वाचे आहे. शहरातही पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशीही मिरजपूर्व भागातील राजकारणातून खासदार पाटील यांचे खटके उडाले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत संधींतूनही हा रोष उघड नसला तरी कायम असल्याची चर्चा आहे. अगदी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांची नरमाईची भूमिका असली तरी काही बाबतीत त्यांनाही सल आहेच. 

एकूणच या सर्वाचा साचलेला राग हा 2019 मध्येच संजय पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणारा ठरला होता. त्यावेळी खुद्द आमदार गोपीचंद पडळकर यांनी वंचितमधून संजय पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकत घाम फोडला होता. पण त्यावेळी स्थानिक व राज्यातील नेत्यांनी समझोता घडवून वेळ मारून नेली. पाटील यांना भाजपमधून उमेदवारी मिळालीच, शिवाय भाजप व पाटील विरोधी नाराजी विरोधक ‘स्वाभिमानी’कडे न वळता पडळकरांची उमेदवारी त्यांना फायद्याची ठरली होती. त्यातून पाटील यांना विजयश्री गाठता आला. पण त्यानंतरही हा सलोखा पुढे कायम राहिला नाही. भिडस्त व बेधडक संजय पाटील यांनीही त्याची फिकीर न करता आपला ‘ठेका’ कायम ठेवल्याने पुन्हा जिल्हाभर या सर्वांत त्यांच्याबद्दल नाराजी वाढविणारी ठरली आहे. 

साहजिकच आता यामुळे पुन्हा नाराजीचा सूर अधिक वाढतच गेला आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ या सर्वांनीच खासदारविरोधी मताचा वारंवार पाढा थेट राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर नेत्यांपर्यंत पोहोचविला आहे. अगदी खासदारांबद्दल जनतेत नाराजीपर्यंतही  मतप्रवाह पोहोचविला आहे. यामुळे यावेळी उमेदवारी बदल कराच असा आग्रह धरला आहे. प्रसंगी उमेदवारी न बदलल्यास पक्षाला फटका बसेल असा थेट इशाराही या सर्वांनी दिला आहे. या दरम्यान पर्याय सक्षम कोण अशीही विचारणा करण्यात आल्याचे समजते. यात पृथ्वीराज देशमुखांच्या नावाला या सर्वांनी पसंती दर्शविल्याचे समजते. त्यादृष्टीने पृथ्वीराज देशमुखांनीही तयारी दर्शविली असून, मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक सर्व्हेचा अहवालही दोन्हीकडे पोहोचविला आहे. दुसरीकडे संजय पाटील यांनी मात्र भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आपली मजबूत पकड ठेवली आहे. यातच पृथ्वीराज देशमुखांची अध्यक्षपदाची जबाबदारी कमी करून त्यांना पक्षाकडून तयारीसाठी वाट मोकळी केल्याची चर्चा आहे. आता यातून काय फैसला होणार याकडे मात्र दोन्ही गटाचे लक्ष लागून आहे.


दोन्ही डगरीवर हात... स्व:कियांचा रोष वाढविणारा

खासदार पाटील यांचा सर्वपक्षीयांमध्ये बोलबाला असल्याचे गेल्या दहा वर्षांत दिसून आले. याचा फायदा त्यांना दोन-अडीच लाखांच्या मताधिक्याला बळ देणारा ठरला. त्यामुळेच त्यांनी विरोधी राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी सलगी ठेवली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षाच्या आमदारांनाही शासन-प्रशासन पातळीवर हेल्पिंग हँड देण्याची भूमिका त्यांनी ठेवली. याचा फटका स्व:पक्षीयांमध्ये नाराजी वाढविणारा ठरत गेला आहे. यातूनच पक्षीय नेते, कार्यकर्त्यांना गृहीत धरून त्यांचे दोन्ही गडरीवर राजकारण असल्याचा सूर राहिला आहे. त्यांचे बेरजेचे हे राजकारण परिणामी स्वकियांमध्ये रोष वाढविणारे ठरत आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी