पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

RAJARAMBAPU PATIL : लोकनेते राजारामबापू पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

इमेज
 स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना प्रतिक पाटील समवेत माजी मंत्री आ.जयंतराव पाटील RAJARAMBAPU PATIL :  लोकनेते राजारामबापू पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन इस्लामपूर : प्रतिनिधी लोकनेते राजारामबापू पाटील यांना 40 व्या स्मृतिदिनानिमित्त राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असंख्य मान्यवर व हजारो बापूप्रेमींनी त्यांच्या पुतळ्यास भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, दिलीपतात्या पाटील, महेंद्र लाड, अँड.बाबासाहेब मुळीक, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, मन्सूर खतीब, माजी सभापती पै.धनपाल खोत, शेखर माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे-पाटील यांनी स्व. बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.  राज्य शासनाच्या वतीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार प्रदीप उबाळे, बाजार समितीच्या वतीने सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आपुगडे यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार

खासदार धैर्यशील माने म्हणतात, सतेज पाटलांची कोल्हापुरात कळ काढून चालत नाही!

इमेज
 खासदार धैर्यशील माने म्हणतात, सतेज पाटलांची कोल्हापुरात कळ काढून चालत नाही!  ऐन निवडणुकीच्या तोंडावर धास्ती की सावध पवित्रा? कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांचे भरभरून कौतुक केल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. निमशिरगावमधील कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी पी. बी. पाटील विकास सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी धैर्यशील माने यांनी केलेल्या वक्तव्यांची चांगली चर्चा रंगली. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धसका की सावध पवित्रा याची सुद्धा चर्चा रंगली आहे. हातकणंगले मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून माने यांच्यावरून नाराजीचा सूर आहे.  शरद पवार म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे 84 वर्षाचा तरुण  धैर्यशील माने यांनी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. शरद पवार म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे 84 वर्षाचा तरुण अशी स्तुतीस

इस्लामपुरात कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

इमेज
कुस्ती स्पर्धेसाठी टाकलेली अद्यावत मॅट, व्यासपीठ, गॅलरी इस्लामपुरात कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी   इस्लामपूर :  राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी 17 रोजी पुरुष व महिला मानधन कुस्ती स्पर्धा होत असून, या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 15 वर्षानंतर ही मानधन कुस्ती स्पर्धा होत असल्याने कुस्ती मल्ल व कुस्ती प्रेमींमधून या स्पर्धेचे जोरदार स्वागत केले जात आहे. राजारामबापू कुस्ती केंद्राच्या मैदानात होणार्‍या या स्पर्धेचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याहस्ते दुपारी 3 वाजता उदघाटन केले जाणार आहे. लोकनेते राजारामबापू पाटील हे बडोदा विद्यापीठाचे चॅम्पियन होते. त्यांनी असंख्य पैलवानांना सातत्याने सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पश्चात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अद्यावत कुस्ती केंद्र सुरू करून कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांना अद्यावत प्रशिक्षण व मानधन कुस्ती स्पर्धेतून आर्थिक आधार दिला होता.  स्व.मानसिं

jayant patil : कर्नाटकात बजरंग बलीचा आणि आता देशात रामाचा आधार

इमेज
   jayant patil : कर्नाटकात बजरंग बलीचा आणि आता देशात रामाचा आधार जयंत पाटलांचा पीएम मोदींना टोला निपाणी : महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सीमाभागातील निपाणीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला.  यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की, काळ बदलला आहे, देशातील परिस्थिती वेगळी आहे. कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला होता. आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे. महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.   ते पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसला होता तोच उत्साह दिसत आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत उत्तम पाटील हे आगामी निवडणुकीत आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.  मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळा

जिल्हा नियोजन समितीवर वैभव पाटील, जगदाळेंसह अजितदादा गटाचे चार जण

इमेज
जनप्रवास । प्रतिनिधी सांगली: सांगली जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह चार जणांची वर्णी लागली आहे. विशेष निमंत्रित म्हणून या सदस्यांच्या निवडी शासनाकडून सोमवारी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सदस्यांच्या निवडी होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या चार जणांची वर्णी लावून अजितदादांनी भाजप-शिवसेनाला धक्का दिला आहे.  जिल्हा नियोजन समितीवर वैभव पाटील, जगदाळेंसह अजितदादा गटाचे चार जण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार गटाने ताकद वाढविण्यास सुरूवात केली. माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील व पद्माकर जगदाळे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला होता. दादांनी वैभव पाटील यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तर जगदाळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर अनेकजण अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत. जिल्ह्यात अजितदादा गटाची ताकद वाढत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर अजितदाद

kolhapur loksabha: ज्यानं हरवलं त्याचाच प्रचार करण्याची वेळ!

इमेज
 ज्यानं हरवलं त्याचाच प्रचार करण्याची वेळ!  कोल्हापूर लोकसभेला मंडलिक महाडिकांचा राजकीय ’योगायोग’! कोल्हापूर लोकसत्ता : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून रविवारी राज्यभर मेळावे घेण्यात आले. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग सुद्धा फुंकण्यात आले. महायुतीचा कोल्हापूरमध्ये सुद्धा मेळावा पार पडला. यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबिटकर सोडून सर्वच महायुतीच्या नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. कोल्हापुरातील दोन्ही जागा शिंदे गटाला  या मेळाव्यामध्ये बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभेसह हातकणंगले लोकसभेची जागा शिंदे गटाला सोडण्यात येईल, याबाबत निर्णय झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हापुरातील दोन जागा शिंदे गटाला मिळणार यावर जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपने कोल्हापूर लोकसभेसाठी चांगलीच चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता ही जागा आपण शिंदे गटासाठी राहणार की ऐनवेळी यामध्ये का

आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली?

इमेज
आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली?  सदाभाऊ खोतांचा भाजपला संतप्त सवाल सांगली: आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुका जवळ आल्यावरच भाजपला मित्रपक्षांची आठवण होते असं म्हणत माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. घटक पक्षाला सन्मान द्या, मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.  सांगलीतील महायुतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची खदखद बाहेर आली. ते म्हणाले की, सगळ्यांना खर्‍या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि सेना हे मोठे पक्ष आहेत. छोटे घटक बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे. असे करू नका, आम्हालाही सन्मान द्या.  सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही, तो सन्मान द्या.  घटक पक्ष आला की हसू नका. मुंगी

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी