SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली?
सांगली: आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुका जवळ आल्यावरच भाजपला मित्रपक्षांची आठवण होते असं म्हणत माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. घटक पक्षाला सन्मान द्या, मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
सांगलीतील महायुतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची खदखद बाहेर आली. ते म्हणाले की, सगळ्यांना खर्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि सेना हे मोठे पक्ष आहेत. छोटे घटक बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे. असे करू नका, आम्हालाही सन्मान द्या.
सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही, तो सन्मान द्या. घटक पक्ष आला की हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, आम्ही आता मोदी, फडणवीस यांच्याकडे पाहून काम करू. पण तण काढणारा उपाशी राहता कामा नये. कारण त्यांना विचारात घ्या. सन्मान द्या घटक पक्षांची अपेक्षा काय असते. विकास कामासाठी आम्हाला थोडा निधी दिली दिला असता तर बरं झालं असतं. आम्ही लाठ्या, काठ्या खाल्ल्या आहेत. माढामध्ये आम्हाला 5 लाखांच्या वर मतं मिळाली आहेत. तुम्ही आम्हाला गुलाम समजू नका.
“तुम्ही आमचा अपमान करू नका. आम्ही लढणारी माणसं आहोत. त्यामुळे मोदी आणि फडणवीसांसाठी आम्ही लढणार आहोत. म्हणून घटकपक्षांनाही सन्मान द्या. कोण आलं की काही जण बघून हसतात. पण बघून हसू नका. मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
“आम्ही चळवळीतले नेते आहोत. शेवटी निवडणुकीच्या तोंडावर आमची आठवण आली. सत्तेच्या काळात घटकपक्षांना उचित सन्मान दिला नाही. निधीही दिला नाही. सर्व घटकपक्षांना तुम्ही बोलवायला हवं होतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही खुरपी घेऊन आलोय. तण काढतोय, पण आमची उपेक्षा करू नका”, असंही खोत म्हणाले.
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांत आज महायुतीचा समन्वय मेळावा झाला. या मेळाव्यात महायुतीचे सर्व घटकपक्ष उपस्थित होते. या मेळाव्याची जबाबादारी महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात आली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ चा आकडा गाठण्यासाठी महायुतीने जय्यत तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा