MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

RAJARAMBAPU PATIL : लोकनेते राजारामबापू पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना प्रतिक पाटील समवेत माजी मंत्री आ.जयंतराव पाटील



RAJARAMBAPU PATIL :  लोकनेते राजारामबापू पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


इस्लामपूर : प्रतिनिधी


लोकनेते राजारामबापू पाटील यांना 40 व्या स्मृतिदिनानिमित्त राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असंख्य मान्यवर व हजारो बापूप्रेमींनी त्यांच्या पुतळ्यास भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले.




माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, दिलीपतात्या पाटील, महेंद्र लाड, अँड.बाबासाहेब मुळीक, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, मन्सूर खतीब, माजी सभापती पै.धनपाल खोत, शेखर माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे-पाटील यांनी स्व. बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. 

राज्य शासनाच्या वतीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार प्रदीप उबाळे, बाजार समितीच्या वतीने सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आपुगडे यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉ.प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, भिमराव पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, 


सुनीता देशमाने,कमल पाटील, माजी सभापती शैलजा पाटील, अँड.विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, स्वरूप पाटील, संग्राम जाधव, देवराज देशमुख, मोहन पाटील, सतिश पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, शंकरराव गायकवाड, अँड.चिमण डांगे, अँड.धैर्यशिल पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजी खराडे, राजेंद्र चव्हाण, सी.व्ही.पाटील, सर्जेराव देशमुख, डॉ.एन.टी.घट्टे, जे. डी.मोरे, अविनाश खरात, पी.बी.सुर्वे, विजय लोंढे, संजय खवळे यांच्यासह कारखाना, बँक, दूध संघाचे आजी-माजी संचालक, बापू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक बाळासाहेब पवार, विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.


लोकनेते राजारामबापूंना दूध संघात आदरांजली


फोटो- राजारामबापू दूध संघ कार्यस्थळावर स्व. बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना संचालक दिलिप खांबे समवेत संघाचे सर्व विभागप्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी




लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दूध संघ कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापुंचे पुतळयाची विधीवत पूजा संघाचे संचालक दिलिप खांबे यांच्या हस्ते झाली.


यावेळी दूध संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील, व्हा.चेअरमन शशिकांत पाटील, संचालक विनायकराव पाटील, जगन्नाथ पाटील, संघाचे सर्व विभागप्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी