MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

इस्लामपुरात कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी


कुस्ती स्पर्धेसाठी टाकलेली अद्यावत मॅट, व्यासपीठ, गॅलरी

इस्लामपुरात कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

 इस्लामपूर :  राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी 17 रोजी पुरुष व महिला मानधन कुस्ती स्पर्धा होत असून, या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 15 वर्षानंतर ही मानधन कुस्ती स्पर्धा होत असल्याने कुस्ती मल्ल व कुस्ती प्रेमींमधून या स्पर्धेचे जोरदार स्वागत केले जात आहे. राजारामबापू कुस्ती केंद्राच्या मैदानात होणार्‍या या स्पर्धेचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याहस्ते दुपारी 3 वाजता उदघाटन केले जाणार आहे.




लोकनेते राजारामबापू पाटील हे बडोदा विद्यापीठाचे चॅम्पियन होते. त्यांनी असंख्य पैलवानांना सातत्याने सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पश्चात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अद्यावत कुस्ती केंद्र सुरू करून कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांना अद्यावत प्रशिक्षण व मानधन कुस्ती स्पर्धेतून आर्थिक आधार दिला होता. 


स्व.मानसिंग पाटील(बापू),स्व.जे.बी. शिंदे (आबा),स्व.जयवंत शिंदे,स्व.शामराव लाड यांच्यासारख्या अनेक कुस्तीप्रेमींनी या कुस्ती केंद्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील,महाराष्ट्र चॅम्पियन पै.विकास पाटील,पै.विनायक पाटील, पै.विलास शिंदे,उपमहाराष्ट्र केसरी पै.अशोक मोरे,पै.तानाजी खरात,पै.अनिल बाबर, पै.सुरेश पाटील यांचेसारखे अनेक नामवंत मल्ल कुस्ती केंद्राने घडविले आहेत. मध्यंतरी काही वर्षे बंद असणारी ही स्पर्धा प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झाली आहे.




कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील,महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्यासह जिल्ह्या तील नामवंत मल्ल,कुस्ती मार्गदर्शक, कारखान्याचे संचालक-अधिकारी व पैलवान यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न होत आहे.

संचालक कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील, शैलेश पाटील,सचिव डी.एम.पाटील,वस्ताद कुंडलिक गायकवाड,नितीन सलगर,धीरज भोसले आदी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.




स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन व व्याख्यान

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 40 व्या पुण्यतिथी निमित्त माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याहस्ते सकाळी 7.30 वाजता कारखाना कार्यस्थळावर स्व.बापुंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले जाणार आहे. यानंतर पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते यशवंत गोसावी यांचे स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा व सद्य परिस्थिती या विषयावर व्याख्यान होणार आहे.


टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी