SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

ते पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसला होता तोच उत्साह दिसत आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत उत्तम पाटील हे आगामी निवडणुकीत आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपवर तोफ डागली. यावेळी बोलताना त्यांनी इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली. शरद पवार बोलताना म्हणाले की, मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. मात्र, आता राम मंदिराचे काम बाजूला राहिलं आहे आणि भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे.
राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरीबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. पीएम मोदी करत असलेल्या दहा दिवसांच्या उपवासावर शरद पवारांनी खोचक शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी दहा दिवस उपवास करत आहेत, त्यांनी तसाच उपवास लोकांची उपासमार घालण्यासाठी सुद्धा करावा अशी टीका त्यांनी केली.
बॉलिवूड विश्वातील सर्वांत मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 28 जानेवारीला गुजरात टुरिजमच्या सहाय्याने गुजरात येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित केला जायचा. मात्र, आता गुजरातमध्ये आयोजित करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.
जयंत पाटील म्हणाले. दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे.
आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा