पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ,

इमेज
 सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ, ’पाणीदार’ आमदार अनिल बाबर आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.  पाणीदार आमदार -  पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. तसा खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त.  कृष्णा खोर्‍यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. 2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सरपंच ते चार वेळा आमदार, मंत्रिपदाची हुलकावणी -  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.  2019 मध्ये शिवसेनेच्

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश

इमेज
 वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होते. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभे केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र अखेर आज वंचितचा मविआत समावेश करत असल्याचे पत्र जारी करण्यात आले.  गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हा़वे, यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचे या पत्रात म्हटलं आहे.  महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्यावतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.  वंचितची महाविकास आघाडीमध्

पंकजा मुंडे, विनोद तावडे, मिलिंद देवरा राज्यसभेसाठी चर्चेत

इमेज
 पंकजा मुंडे, विनोद तावडे, मिलिंद देवरा राज्यसभेसाठी चर्चेत राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज; पाच जागांसाठी रणनीती मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. महायुतीने तशी तयारी देखील सुरू केली असून, पाच जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे.  निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.  राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम ज

गाडी आडवी मारल्याच्या रागातून समडोळी फाट्यावर तरुणास बेदम मारहाण :

इमेज
 गाडी आडवी मारल्याच्या रागातून समडोळी फाट्यावर तरुणास बेदम मारहाण :  अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल. सांगली : लक्ष्मी फाटा ते कवठेपेरानकडे जाणार्‍या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या तरुणास अडवून गाडी आडवी का मारली या रागातून चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटनाही शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समडोळी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी जखमी मोहसीन गुफुर मोमीन (वय 37 रा. भादोले ता. हातकणंगले) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी मोहसीन मोमीन हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले गावामध्ये राहतात. सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात ते ब्रदर म्हणून काम करतात. शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री काम आटोपून मोमीन हे गावी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान कडे जाणार्‍या मार्गावरून जात असताना समडोळी फाट्याजवळ अज्ञात चौघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी मोमीन यांची दुचाकी अडवून तू आमच्या

नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला

इमेज
इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शहांशी भेटून भाजपशी बोलणी;  नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला पाटणा  : नवीन पात्रं येत आहेत, पण जुने नाटक चालू आहे प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांच्या या ओळी बिहारच्या राजकारणावर अगदी चपखल बसतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच राहणार आहेत. नितीश कुमार यांनी आज रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.  दीड महिन्यापूर्वी स्क्रिप्ट लिहिली गेली  2022 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी दुसर्‍यांदा भाजप सोडला आणि आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले की त्यांना मरायला आवडेल पण भाजपसोबत जाणार नाही. नितीशकुमारांसाठी हे गेट कायमचे बंद होणार असल्याचेही भाज

नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!

इमेज
 नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी! सकाळी राजीनामा, दुपारी पाठिंब्याचं पत्र, संध्याकाळी पुन्हा शपथ;  पाटणा :  कालपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते. नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे

शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,

इमेज
 शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,  अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी; जयंत पाटलांचा युक्तिवाद मुंबई : शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (यांनी सांगितलं. तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केली असंही उत्तर त्यांनी दिलं. राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यावेळी अजित पवार गटाच्या वतीने जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली.  त्या आधीच्या यिु्क्तवादात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.  वकिलांचे प्रश्न आणि जयंत पाटलाचं उत्तर पुराव्याच

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी