MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ,


 सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ, ’पाणीदार’ आमदार अनिल बाबर

आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. 

पाणीदार आमदार - 

पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. तसा खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त.  कृष्णा खोर्‍यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. 2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.




सरपंच ते चार वेळा आमदार, मंत्रिपदाची हुलकावणी - 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.  2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभे राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत.  15 वर्ष शरद पवारांसोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले. त्यानंतर 2014 मध्ये अनिल बाबर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता.  2019 च्या महाविकास आघाडीच्या सरकारवेळी मंत्रिपदासाठी अनिल बाबर यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यावेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती.

शरद पवारांसोबत 15 वर्षे -

सांगलीच्या खानापूर-आटपाडीमधून अनिल बाबर चार वेळा आमदार म्हणून निवडणूक आले होते. अनिल बाबर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे. 1999 ते 2014 अशी तब्बल 15 वर्षे ते पवारांसोबत होते. पण 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आघाडीच्या काळामध्ये टेंभू योजनेचं काम रखडल्याचा दावा करत त्यांनी पक्षांतर केलं होतं. 2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेला गती मिळाली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. पण त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. 




एकनाथ शिंदेंना साथ - 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी अनिल बाबर यांची ओळख होती. शिवसेनामध्ये उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे  गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते.  ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.

बाबर कुटुंबियांवर शोककळा -

गेल्यावर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. आता सहा महिन्यानंतर अनिल बाबर यांचंही निधन झालेय. वर्षाच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या दोन सदस्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. 

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा प्रवास
1972 सांगली झेड पी सदस्य
1981 बांधकाम विभाग सभापती
1990 खानापूर पंचायत समिती सभापती
1990 ला अपक्ष म्हणून आमदार 
1999 दुसर्‍यांदा आमदार  अपक्ष 
(  राष्ट्रवादी सहयोगी ) ( माझी गृहमंत्री आर आर पाटील यांचे जवळीक मित्र.. 
1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनियरिंग चे  अध्यक्ष
टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख
सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक
2014  व  2019 शिवसेनेच्या तिकिटावर आमदार

देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक

ऐनवेळी फडणवीस यांच्या आग्रहामुळे गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला पाठींबा दिल्याने निवडणुकीत यश

एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख...

विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे मंजूर...

मंत्रिपदासाठी नव्हे, टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदेंसोबत : आमदार अनिल बाबर

मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी दिली होती.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी