MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता,



 शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, 

अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी; जयंत पाटलांचा युक्तिवाद

मुंबई : शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (यांनी सांगितलं. तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केली असंही उत्तर त्यांनी दिलं. राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यावेळी अजित पवार गटाच्या वतीने जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली. 

त्या आधीच्या यिु्क्तवादात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. 


वकिलांचे प्रश्न आणि जयंत पाटलाचं उत्तर

पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राचा परिच्छेद 52(111) दर्शविला आहे.


वकील - तुम्ही या परिच्छेदातील विधाने बरोबर असल्याची मान्य करता?


जयंत पाटील - मी आधी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी राजीनामा दिला नाही, परंतु राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.


वकील - याआधीच्या उत्तरात जे सांगितले आहे ते तुम्ही तुमच्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राच्या परिच्छेद 52 मध्ये सांगितलेल्या गोष्टीशी सुसंगत नाही?


जयंत पाटील - परिच्छेद 52(11) मध्ये जे सांगितले आहे ते थोडक्यात वस्तुस्थितीचा उल्लेख करण्यासाठी म्हटले आहे. परंतु शरद पवारांनी कधीही राजीनामा दिलेला नाही. लोक त्यांची निवृत्ती स्वीकारण्यास तयार नव्हते हे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे.





वकील - तुम्ही तुमच्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राच्या परिच्छेद 52(खश्रश्र) मध्ये केलेले विधान कोणत्या दस्तऐवजावर आधारित आहे?


जयंत पाटील - शरद पवार यांनी प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही म्हणून कोणतेही कागदपत्र नाही. तेही त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात जाहीर केलं होतं.


वकील - 11 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्य समितीच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी कोणतेही प्राधिकार जारी करण्यात आले होते का?


जयंत पाटील - होय, मी प्रतिनिधींची यादी बनवली आहे आणि ती राष्ट्रीय निवडणूक अधिकारी पितांबरन यांना पाठवली आहे.


वकील - तुमच्या मते किती आमदार पक्षाच्या घटनेच्या आणि धोरणाच्या विरोधात गेले होते?


जयंत पाटील - सुरुवातीला 9 सदस्य होते. बाकीचे सदस्य शरद पवारांना नियमित भेटत होते. एकदा पहिल्या 9 सदस्यांनीही शरद पवार यांना भेटून त्यांची शपथविधी स्वीकारण्याची विनंती केली. गटातील उर्वरित आमदार, सुमारे 25 ते 37 आमदार आले आणि त्यांनी 25 जुलै रोजी पवार यांच्याकडे माफी मागितली आणि त्यांना एउख कडून संवाद मिळाल्यानंतर तोंडी विनंती केली. जवळपास 35 आमदार अजित पवार गटासोबत असल्याचे आम्हाला समजले. असे असतानाही हे सर्व आमदार जाहीरपणे सांगत होते की आपण शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांच्या सर्व कार्यक्रमात पवारांचा फोटो लावतो. पवार आणि मला अनेकजण खाजगीत भेटून असे सूचवत होते की जे काही घडत आहे ते त्यांना सोयीचे नाही. त्यांना शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा आहे.





वकील - प्रतिवादीविरुद्ध दाखल केलेल्या 3 याचिकांपैकी, शेवटची याचिका 7 सप्टेंबर 2023 रोजी दाखल करण्यात आली होती.


जयंत पाटील - प्र.45 मधील माझ्या उत्तरानुसार, आमदार आपण दोन्ही बाजूंचे असल्याचे दाखवत होते. परंतु सप्टेंबर 2023 रोजी आम्ही याचिकेत नमूद केलेल्या सर्व आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.

 

वकील - तुमच्या 2023 च्या याचिका क्रमांक 3 मध्ये, परिच्छेद 16 मध्ये, तुम्ही असे नमूद केले आहे की प्रतिवादींनी राष्ट्रवादी पक्षावर बेकायदेशीरपणे दावा केला आहे. यावरून शरद पवार ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत ते पक्षाच्या विरोधात एकत्र आहेत आणि कृती करत आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का?


जयंत पाटील - हो


वकील - पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राचा परिच्छेद 28 दर्शविला आहे. तुमचे विधान आजपर्यंत ... ... माननीय भारतीय आयोग हे केवळ महाराष्ट्रासाठी किंवा उर्वरित देशासाठीही निश्चित आहे का?


जयंत पाटील - संपूर्ण देशासाठी देखील. केंद्रीय निवडणूक अधिकारी टी. पी. पितांबरन यांच्याकडे ते दाखल केले आहे

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी