MY POSTS
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होते. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभे केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र अखेर आज वंचितचा मविआत समावेश करत असल्याचे पत्र जारी करण्यात आले.
गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हा़वे, यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचे या पत्रात म्हटलं आहे.
महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्यावतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वंचितची महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला अद्याप अधिकृत पत्र प्राप्त झाले नाही, ते मिळाल्यावर भूमिका मांडू असे म्हटले.
मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी बैठकीचं आमंत्रण आल्याचं जाहीर केले होतं. त्यांच्यावतीने आज बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर पोहोचले. त्यांच्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, विनायक राऊत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोलेंसह वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. लोकसभेच्या दृष्टीने आज झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा