MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला



इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शहांशी भेटून भाजपशी बोलणी; 

नितीशकुमारांनी 50 दिवसांत ’खेळ’ केला

पाटणा  : नवीन पात्रं येत आहेत, पण जुने नाटक चालू आहे प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांच्या या ओळी बिहारच्या राजकारणावर अगदी चपखल बसतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच राहणार आहेत. नितीश कुमार यांनी आज रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. 




दीड महिन्यापूर्वी स्क्रिप्ट लिहिली गेली 

2022 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी दुसर्‍यांदा भाजप सोडला आणि आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले की त्यांना मरायला आवडेल पण भाजपसोबत जाणार नाही. नितीशकुमारांसाठी हे गेट कायमचे बंद होणार असल्याचेही भाजपमधील अनेक नेत्यांनी सांगितले, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, असे काय झाले की दोन्ही बाजूंनी सर्व काही विसरले गेले. 

हा संपूर्ण खेळ समजून घेण्यासाठी तुम्हाला 50 दिवस मागे जावे लागेल. 10 डिसेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमात अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली होती. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर अमित शाह आणि नितीश कुमार यांची ही पहिलीच भेट होती.




या बैठकीनंतर बिहारमधील राजकीय चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर 19 दिवसांनी नितीश कुमार यांनी गऊण च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यातच नितीश कुमार यांनी स्वतः लालन सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवून पदाची सूत्रे हाती घेतली. अध्यक्ष बनताच नितीशकुमार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अध्यक्ष बदलल्यानंतर 16 दिवसांनी अमित शाह यांची नितीश कुमार आणि जेडीयूबाबतची भूमिका बदलली. एका मुलाखतीत अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्या पुनरागमनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, राजकारणात इतर कशाचीही चर्चा होत नाही. कोणाचा प्रस्ताव असल्यास त्यावर विचार केला जाईल. 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी