SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

सांगली : लक्ष्मी फाटा ते कवठेपेरानकडे जाणार्या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या तरुणास अडवून गाडी आडवी का मारली या रागातून चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटनाही शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समडोळी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी जखमी मोहसीन गुफुर मोमीन (वय 37 रा. भादोले ता. हातकणंगले) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी मोहसीन मोमीन हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले गावामध्ये राहतात. सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात ते ब्रदर म्हणून काम करतात. शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी रात्री काम आटोपून मोमीन हे गावी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान कडे जाणार्या मार्गावरून जात असताना समडोळी फाट्याजवळ अज्ञात चौघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी मोमीन यांची दुचाकी अडवून तू आमच्या आडवी गाडी का मारलास असे म्हणून शिवीगाळ करू लागले. यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर चौघांनी संगनमत करून मोमीन यांना लथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत मोमीन हे गंभीर जखमी झाले.
यानंतर चौघांनी तेथून पळ काढला. घडलेल्या या घटनेनंतर मोमीन यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सांगली : शहरातील नेमिनाथनगरमध्ये एका अज्ञात दूचाकीस्वाराने धडक दिल्याने रावसाहेब पाटील हे जखमी झाले आहेत. अपघाताची घटना 21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी सचिन रावसाहेब पाटील यांनी दि. 27 जानेवारी रोजी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी आपले वडील सायकलवरुन जात असताना अज्ञात दूचाकीस्वाराने त्यांना धडक देवून पलायन केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा