पोस्ट्स

MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

वंचितची मविआकडे 27 जागांची मागणी,

इमेज
 वंचितची मविआकडे 27 जागांची मागणी,  अकोला, जालना आणि पुणे लोकसभेसाठी आग्रह! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे  27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.  20 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा  महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचाआणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम आहे. तर वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे.  वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव सादर  आम्ही 27 जागांसाठी यादी दिली. काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मविआमध्ये सहभागी

महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल, शाहू महाराज

इमेज
 महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल, शाहू महाराज  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही, असे नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ती लवकरच येईल, असा निर्वाळा दिला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी असे विधान करत एक प्रकारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आपण उमेदवार असणार, असे स्पष्ट केले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा झाला. तेव्हा त्यांनी सर्वप्रथम श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबतची चर्चा केली होती. तथापि, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शाहू महाराज हे निवडणुकीबाबत चर्चेत आहेत. हे मला प्रथमच कळत आहे, असे सांगितले. पण याचवेळी त्यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील तर आम्हाला आनंदच होईल, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते. त्यानंतर गेले दोन दिवस कोल्हापुरात शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू होती. याबाबत आज श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधून कोल्हाप

किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,

इमेज
 किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,  शरद पवार गटाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 24 फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे. कार्यक्रमाचा खास टिझर प्रदर्शित शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावर या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलीय. या कार्यक्रमाचे एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय. शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आलीय. या

शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

इमेज
 शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-  रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील उड्डाणपूलावरील सिमेंटच्या कठड्याला भरधाव वेगात असलेल्या क्रेटा गाडीने जोरदार धडक देऊन झालेल्या आपघातात तीन जन जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात सोमवारी सायंकाळी 4.30 दरम्यान घठला आपघातातील मृत व जखमी हे कोल्हापूर येथील आहेत. अपघातात कोल्हापूर येथील छत्रपती पार्क, रमण मळा येथील सुर्यकांत दगडू जाधव,(वय 56) गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव हे तिघेजण जागीच ठार झाले असून प्रशांत पांडुरंग चिले हे गंभीर जखमी झाले आहेत.हे सर्वजण कोल्हापूर येथील छत्रपती पार्क रमण मळा येथील रहिवशी आहेत. पोलीस सूत्राकडून व घटनास्थळा वरून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोल्हापूर सराफी व्यवसायिक असलेले जाधव कुटुंबीय एम.एच.09/ जी एफ- 8323 या क्रेटा बनावटीच्या गाडीने पंढरपूर हून कोल्हापूर कडे जात होते.शिरढोण येथील उड्डाणपूलावरील कठड्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उड्डाणपूलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरदार आदळली. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले

जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

इमेज
जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या  महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र!  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सूरू झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय महाविकास आघाडीचे वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक बदनाम करण्याच षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.  अशोक चव्हाण यांच्यानंतर जयंत पाटलांच्या चर्चा  जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एक बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. नुकतंच काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्ताधारी पक्षात गेल्याने जयंत पाटील यांच्या पदरात काय पडणार इथपर्यंत चर्चा रंगू लागल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी

विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त

इमेज
 विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त प्रसिद्ध जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ’आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे जाऊन आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती. डोंगरगडमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माँ बामलेश्वरी मंदिरातही मोदींनी पूजा केली होती. वर्षानुवर्षे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथी

जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,

इमेज
जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन,  77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर डोंगरगड : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमधील सदलगा येथे झाला होता.  संत आचार्य विद्यासागर महाराजांनी घेतली समाधी दिगंबर जैन आचार्य होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच्यावर रविवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  आज पंचतत्वात होणार लीन जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री 2.30 वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचे निधन झाले. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-ज

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी