MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार



 शिरढोण येथील अपघातात कोल्हापूरचे तिघे जागीच ठार


कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-  रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील उड्डाणपूलावरील सिमेंटच्या कठड्याला भरधाव वेगात असलेल्या क्रेटा गाडीने जोरदार धडक देऊन झालेल्या आपघातात तीन जन जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात सोमवारी सायंकाळी 4.30 दरम्यान घठला आपघातातील मृत व जखमी हे कोल्हापूर येथील आहेत.

अपघातात कोल्हापूर येथील छत्रपती पार्क, रमण मळा येथील सुर्यकांत दगडू जाधव,(वय 56) गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव हे तिघेजण जागीच ठार झाले असून प्रशांत पांडुरंग चिले हे गंभीर जखमी झाले आहेत.हे सर्वजण कोल्हापूर येथील छत्रपती पार्क रमण मळा येथील रहिवशी आहेत.

पोलीस सूत्राकडून व घटनास्थळा वरून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोल्हापूर सराफी व्यवसायिक असलेले जाधव कुटुंबीय एम.एच.09/ जी एफ- 8323 या क्रेटा बनावटीच्या गाडीने पंढरपूर हून कोल्हापूर कडे जात होते.शिरढोण येथील उड्डाणपूलावरील कठड्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उड्डाणपूलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरदार आदळली.

या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर व्यक्तीस मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे.जाधव हे परिसरातील वारकरी पंढरपूर येथे माघी वारीस जाणार होते.त्याचे नियोजन करण्यासाठी ते पंढरपूर येथे गेले होते.पंढरपूर येथील भक्त निवास निश्चित करून ते परत कोल्हापूर कडे निघाले असता आपघात झाला आहे.

अपघाताची माहीती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस व कवठेमहांकाळचे येथील पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झाले. या आपघातात क्रेटा गाडी चक्काचुर झाली आहे आपघात स्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस अधिकारी व पोलीस यांनी तातडीने भेट दिली.

अपघाताची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर,यांच्या मार्गदर्शना खाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत. 

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी