MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण,



 किल्ले रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण, 

शरद पवार गटाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन


मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 24 फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे.

कार्यक्रमाचा खास टिझर प्रदर्शित

शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावर या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलीय. या कार्यक्रमाचे एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय.

शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आलीय. या टिझरला खासदार अमोल कोल्हे यांचा आवाज आहे. आता अवघा देश होणार दंग, शरद पवार यांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचाअनावरण सोहळा 24 फेब्रुवारी 2024 रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय. या कार्यक्रमाला शरदपवार गटाचे अनेक नेते, कार्यकर्ते हजेरी लावण्याची शक्यता आहे.


आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग!


‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. 

शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसंच, अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. परंतु, त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही. तर, निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी