MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या



जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

 महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र! 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सूरू झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय महाविकास आघाडीचे वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक बदनाम करण्याच षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. 

अशोक चव्हाण यांच्यानंतर जयंत पाटलांच्या चर्चा 

जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एक बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. नुकतंच काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्ताधारी पक्षात गेल्याने जयंत पाटील यांच्या पदरात काय पडणार इथपर्यंत चर्चा रंगू लागल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र जयंत पाटील यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा फेटाळल्या आहेत. भाजपमध्ये 100 पेक्षा जास्त आमदार असून देखील त्यांना विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांची गरज लागते. याचाच अर्थ त्यांना आमच्या पक्षातील टॅलेंटची गरज लागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

अशोक चव्हाणांना भाजप प्रवेश करताच राज्यसभा मिळाली

जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांमुळे सत्ताधारी पक्षांमध्ये अस्वस्था वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये जातं असताना त्यांना थेट राज्यसभेची संधी मिळाली. त्यामुळं जर खरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असतील तर नक्कीच काहीतरी मोठी बाब पदरात पडल्याशिवाय जाणार नाहीत.

विरोधी पक्षातील बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एक बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. नुकतंच काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्ताधारी पक्षात गेल्याने जयंत पाटील यांच्या पदरात काय पडणार इथपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी