MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

वंचितची मविआकडे 27 जागांची मागणी,



 वंचितची मविआकडे 27 जागांची मागणी, 

अकोला, जालना आणि पुणे लोकसभेसाठी आग्रह!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे  27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. 

20 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा 

महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचाआणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम आहे. तर वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. 

वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव सादर 

आम्ही 27 जागांसाठी यादी दिली. काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मविआमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. 12-12-12-12च्या फॉर्म्युल्यासाठी आम्ही आग्रही नव्हतो.ज्या दिवशी पवार साहेब ठाकरे साहेब बैठकीत असतील तेव्हा बाळासाहेब आंबेडकर देखील येतील, असं धैर्यवान पुंडकर म्हणाले आहेत.  

वंचितच्या महाविकास आघाडीकडे 4 मागण्या 

महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे (चरपेक्ष गरीरपसश) पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना मविआचा उमेदवार म्हणून घोषित करावे. मविआच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी तर 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा 4 प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत. 

निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे वचन द्या 

शिवाय, वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसताना ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. मविआच्या प्रत्येक घटकानं लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणूकीपूर्वी आणि नंतर भाजपात सामील होणार नाही, असा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आलाय.

वंचितने दावा केलेल्या 27 जागा कोणत्या? 

अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई साऊथ सेंट्रल, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, रावेर, नांदेड, बुलढाणा, वर्धा,

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी