MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निशिकांत पाटील




शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग, प्रदेशाध्यक्षांकडून निवडी जाहीर 

जनप्रवास  सांगली 

 मागील चार महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी अखेर पार पडल्या. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची तर शहर जिल्हाध्यक्षपदी कुपवाडचे नगरसवेक प्रकाश ढंग यांची निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडी जाहीर केल्या. 

भाजप जिल्ह्यात भाकरी फिरवणार असून संघटनात्मक बदल करणार असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवड होणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले होते. मात्र निवडींबाबत एकमत होत नसल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अखेर बुधवारी त्याला मुर्हूत मिळाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्षाच्या ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदावर नवीन निवडी जाहीर केल्या.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निशिकांतदादा पाटील यांच्यासह संग्रामसिंह देशमुख यांचे नाव चर्चेत होते. पाटील यांची अपेक्षेप्रमाणे या पदावर निवड झाली. पाटील यांच्या माध्यमातून भाजपला इस्लामपूरात माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांच्या विरोधात एक तुल्यबळ नेता मिळाला आहे. पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिका निवडणूकीत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपकडून लढली आणि जिंकली होती. तो जयंत पाटील यांना मोठा धक्का होता. तेव्हापासून पाटील व जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला. अनेक वर्ष जयंत पाटील यांच्या ताब्यात असलेली इस्लामपूर नगरपालिका काढून घेण्याचे श्रेय पाटील यांनाच दिले जाते.

शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आ. नितीन शिंदे, शेखर इनामदार यांची नावे चर्चेत होती. इनामदार यांनी यापुर्वीही एकदा शहर जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे. इनामदार यांची सांगली विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांनी पुन्हा शहर जिल्हाध्यक्ष पद घेण्यास नकार देत अन्य कार्यकर्त्यास संधी देण्याची विनंती पक्षाकडे केली होती. शिंदे यांच्या पत्नी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्याकडे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद आहे. त्यामुळे शिंदे यांना हे पद दिले असते दोन जिल्ह्याध्यक्ष एकाच घरात झाले असते. या कारणांमुळे शिंदे यांची प्रदेशावर वर्णी लावण्यात आली. शहर जिल्हाध्यक्षपदी अनपेक्षितपणे कुपवाडचे नगरसवेक प्रकाश ढंग यांची निवड करण्यात आली. ढंग हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहे. गेल्या पाच वर्षात सांगली महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करतानाही त्यांनी आपल्या कामाची छबी उमटवली आहे.

 

जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार - निशिकांत पाटील

मागील काही वर्षात जिल्ह्यातील विकास कामे रखडली आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्याच्या विकासकामाचा बॅकलॉग भरून काढला जाईल, असे भाजपचे नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी सांगितले. आगामी लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संघटन आणि विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यात यापुढे होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वच उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी